‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याचा दावा !
नवी देहली – ‘वर्ष २०१४ ते २०२२ या काळात खलिस्तान्यांनी देहलीत आपचे सरकार स्थापन करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांना १३३ कोटी रुपये दिले’, असा दावा ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याने केला आहे. ‘मुख्यमंत्री केजरीवाल यांनी खलिस्तानी लोकांशी झालेल्या बैठकीत खलिस्तानी आतंकवादी भुल्लर याला सोडण्याचे आश्वासन दिले होते’, असाही पन्नू याने दावा केला आहे. पन्नू यांनी अडीच मिनिटांच्या एका व्हिडिओद्वारे हे आरोप केले आहेत. पंजाबचे आपच्या सरकारचे मुख्यमंत्री भगवान मान यांच्यावरही पन्नू याने आरोप केले आहेत. या आरोपांवर आम आदमी पक्षाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.
(सौजन्य : The Alternate Media)
१. पन्नू याने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, अरविंद केजरीवाल स्वत:ला प्रामाणिक हिंदु म्हणवतात; पण ते अप्रामाणिक हिंदु आहेत. वर्ष २०१४ मध्ये जेव्हा त्यांच्याकडे सत्ता नव्हती, तेव्हा ते अमेरिकेत आले आणि त्यांनी न्यूयॉर्कमधील खलिस्तान्यांना वचन दिले की, त्यांचे सरकार स्थापन झाल्यास, प्राध्यापक देविंदर पाल सिंग भुल्लर याची ५ घंट्यांच्या आत सुटका केली जाईल. अजूनही भुल्लर याची सुटका झाली नसून पंजाबमधील भगवंत मान यांचे सरकार खलिस्तान्यांबद्दल बोलणार्यांना रोखत आहे.
२. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमध्ये खलिस्तानींच्या विरोधात खोट्या पोलीस चकमकी केल्याचा आरोप पन्नू याने केला.
#Khalistanis gave #Kejriwal Rs 133 crore to form Government in Delhi !
Claim by Gurpatwant Singh Pannu, head of the Khalistani terrorist organization #SikhsforJustice
Patriots believe that an investigation should be conducted into Pannu's claim.#AamAdmiParty #ArvindKejriwal… pic.twitter.com/0XSMrH9SYE
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 25, 2024
कोण आहे भुल्लर ?
देविंदर पाल सिंह भुल्लर याने वर्ष १९९३ मध्ये देहलीत चारचाकीमध्ये बाँब ठेवून त्याचा स्फोट घडवून आणला होता. यात ९ जणांचा मृत्यू झाला होता, तर ३० हून अधिक लोक घायाळ झाले होते. युवक काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर हा स्फोट घडवून आणला होता. यामध्ये युवक काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष एम्.एस्. बिट्टा घायाळ झाले होते. भुल्लर सध्या कारागृहात आहे. त्याला फाशीची शिक्षा झाली; पण नंतर ही शिक्षा जन्मठेपेत पालटण्यात आली.
संपादकीय भूमिकाखलिस्तानी आतंकवादी पन्नू याच्या या दाव्याची चौकशी झाली पाहिजे, असेच राष्ट्रभक्तांना वाटते ! |