Indian Navy Somalia Pirates : भारतीय नौदलाने सोमालियाच्या ३५ समुद्री दरोडेखोरांना दिले मुंबई पोलिसांच्या कह्यात !

मुंबई – भारतीय नौदलाने १६ मार्च या दिवशी व्यापारी नौकेची सोमालियाच्या दरोडेखोरांच्या (चाच्यांच्या) तावडीतून सुटका केली होती. तसेच सोमालियाच्या ३५ दरोडेखोरांना कह्यात घेतले होते. आता त्यांना मुंबई पोलिसांच्या कह्यात देण्यात आले आहे.

समुद्री दरोडेखोरांच्या विरोधात राबवलेल्या मोहिमेच्या अंतर्गत भारतीय नौदलाने भारतीय किनार्‍यापासून २ सहस्र ६०० किलोमीटर दूर असलेल्या दरोडेखोरांवर कारवाई केली आणि त्यांना शरण येण्यास भाग पाडले होते. ही कारवाई ४० घंटे चालली. त्यात नौदलाच्या ‘आय.एन्.एस्. कोलकाता’ आणि ‘आय.एन्.एस्. सुभद्रा’ या युद्धनौका, तसेच सागरी कमांडो सहभागी झाले होते. या वेळी नौकेतील एका सदस्याचीही सुखरूप सुटका करण्यात आली.