पाककडून भारतीय मासेमारी नौकेवर कारवाई करतांना ती बुडाली !

२ भारतीय मासेमार बेपत्ता

कराची (पाकिस्तान) – पाकिस्तानी वर्तमानपत्र ‘द डॉन’च्या वृत्तानुसार २१ मार्च या दिवशी ७ भारतीय मासेमार त्यांच्या नौकेद्वारे पाकिस्तानच्या सागरी हद्दीत घुसले. (भारताची सागरी सीमा कुठपर्यंत आहे, हे भारतीय मासेमारांना कळण्यासाठी सरकार प्रयत्न का करत नाही ? – संपादक) पाकच्या सागरी सुरक्षा यंत्रणेने त्यांना कह्यात घेण्यासाठी प्रयत्न केला असता ही नौका बुडाली. यातील २ भारतीय मासेमार अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे.