‘धर्मशिक्षणवर्ग घेणार्या सर्वच साधकांना श्री. रघुनाथ ढोबळे यांच्या या लेखावरून पुष्कळ काही शिकण्यासारखे आहे’, हे सर्वत्रच्या साधकांनी लक्षात घेऊन त्यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (६.९.२०२३) |
१. धर्मशिक्षणवर्ग घेण्यापूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना शरणागतीने प्रार्थना केल्यावर आलेल्या अनुभूती
‘मी धर्मशिक्षणवर्ग घेण्याची सेवा करतो. धर्मशिक्षणवर्ग घेण्यापूर्वी मी डोळे मिटून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पुढील प्रार्थना शरणागतीने करतो. ‘परात्पर गुरु डॉक्टर, धर्मशिक्षणवर्ग घेण्याची सेवा तुम्हीच माझ्याकडून करून घेत आहात. यासाठी मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो. आपण माझ्या अंतर्मनामध्ये यावे आणि हा धर्मशिक्षणवर्ग चैतन्याच्या स्तरावर होण्यासाठी मला साहाय्य करावे.’ तेव्हा मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
अ. ‘माझ्या अंतर्मनामध्ये परात्पर गुरु डॉक्टर आले आहेत’, याची मला जाणीव होते. तेव्हा मला अंतर्मनात एक वेगळ्या प्रकारची सुखद संवेदना जाणवते.
आ. धर्मशिक्षणवर्गामध्ये विषय मांडतांना मला आनंद मिळतो आणि सर्व धर्मप्रेमीही विषय एकरूप होऊन ऐकतात.
इ. ‘प्रत्यक्ष गुरुदेव माझा देह आणि माझे मुख यांच्या माध्यमातून धर्मशिक्षणवर्ग घेत आहेत’, असे मला जाणवते.
ई. मी गुरुदेवांना प्रार्थना करून धर्मशिक्षणवर्ग घेतो, तेव्हा धर्मप्रेमींनाही चांगले वाटते.
२. माझी व्यष्टी साधना पूर्ण झालेली नसते, त्या दिवशी ‘गुरुदेव अंतर्मनात आले आहेत’, ही संवेदना मला जाणवत नाही आणि मला आनंदही मिळत नाही.
– श्री. रघुनाथ ढोबळे, चिंचवड, पुणे. (२६.६.२०२३)