सातारा – येथील सदरबझार केंद्रातील साधक दांपत्य श्री. सुनील लोंढे आणि सौ. सुलभा लोंढे या दोघांनीही त्यांच्या लग्नाच्या ३४ व्या वाढदिवसाच्या दिवशी (१४ मार्च २०२४ या दिवशी) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाली. याविषयी या साधक दांपत्याचा सत्कार सातारा येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असणार्या सौ. माधुरी दीक्षित यांच्या हस्ते भेटवस्तू आणि श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन करण्यात आला. श्री. लोंढे यांच्या निवासस्थानी झालेल्या या आनंददायी सत्कार सोहळ्यात उपस्थित साधक आणि लोंढे कुटुंबीय यांनी चैतन्य अन् कृतज्ञताभाव यांची अनुभूती घेतली.
सौ. विद्या कदम यांनी लोंढे दांपत्याची गुणवैशिष्ट्ये सांगून दोघेही ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाल्याचे उपस्थितांना सांगितले. या वेळी लोंढे दांपत्याचा कृतज्ञताभाव जागृत झाला. ‘सर्वकाही गुरूंचीच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचीच) कृपा आहे’, असे मनोगत श्री. लोंढे यांनी सांगून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी आणि सर्व सहसाधकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी उपस्थित साधकांनी श्री. लोंढे आणि सौ. लोंढे यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे अन् त्यांची गुणवैशिष्ट्ये सांगून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणार्या कु. श्रद्धा लोंढे (श्री. आणि सौ. लोंढे यांची मुलगी) ‘ऑनलाईन’ संगणकीय प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यांनी ‘आई-बाबांनी अनेक वर्षे साधनेसाठी तळमळीने केलेले प्रयत्न, सेवा आणि साधक यांप्रती असलेला त्यांचा भाव, तसेच कुटुंबियांना साधनारत ठेवण्यासाठी केलेला त्याग’ यांविषयी कृतज्ञतापूर्वक निवेदन केले. या वेळी श्री. आणि सौ. लोंढे अन् उपस्थित साधक यांचा भाव जागृत झाला.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |