|
मुंबई – भांडुप येथील धर्मप्रेमी श्री. प्रमोद काटे हे काही कामानिमित्त २६ फेब्रुवारीला दादर रेल्वेस्थानकाच्या पुलावरून जात असतांना त्यांना एके ठिकाणी गर्दी दिसली. तिथे उषा अशोक मिसाळ ही धर्मांतरित ख्रिस्ती महिला हातात पुस्तक घेऊन ख्रिस्ती धर्माचा प्रचार करत होती. ‘येशू ख्रिस्त चाबकाचे फटके देऊन आणि पवित्र पाणी पाजून अनेक महारोग बरे करतो’, असे सांगून धादांत खोटा प्रचार ती करत होती. बघ्यांची गर्दी हटवत प्रमोद काटे यांनी त्या महिलेस आव्हान दिले की, ‘टाटा रुग्णालयातील अनेक गरीब रुग्णांना तुम्ही बरे करा.’ यावर महिलेने त्यांच्याशी वाद घातला. (आव्हान स्वीकारता येत नसल्यानेच अशा प्रकारे वाद घातला जातो. यावरूनच सत्य काय आहे, ते लक्षात येते ! – संपादक) तेथे आलेल्या रेल्वे पोलिसांनी महिलेला काहीही न बोलता काटे यांच्याशी वाद घालून त्यांना धक्काबुक्की केली. (अशी धक्काबुक्की अन्य धर्मियांना करण्याचे पोलिसांचे धाडस तरी झाले असते का ? – संपादक) श्री. काटे यांनी पोलिसांना ठणकावून सांगितले, ‘‘ही महिला अवैज्ञानिकपणे अंधश्रद्धा पसरवत आहे. ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या‘अंतर्गत तिच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंद झाला पाहिजे.’’ शेवटी पोलिसांनी आरोपी महिला आणि श्री. काटे यांना मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात नेलेे.
पोलिसांकडून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न; पण हिंदूंच्या दबावामुळे गुन्हा नोंद !
याच कालावधीत विक्रोळी येथील ‘शिवकार्य प्रतिष्ठान’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे श्री. प्रभाकर भोसले हे दादरमध्ये उपस्थित होते. त्यांनी ही घटना व्हॉट्सअॅपच्या अनेक गटांवर प्रसारित केली. यामुळे मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात स्थानिक हिंदुत्वनिष्ठ जमले. पोलीस हे प्रकरण मिटवण्यास सांगत होते; परंतु स्थानिक कार्यकर्त्यांचा दबाव आणि अधिवक्त्यांचे मार्गदर्शन, यांमुळे भांडुपचे सतर्क नागरिक श्री. प्रमोद काटे यांनी ख्रिस्ती महिला प्रचारकाविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवण्यास पोलिसांना भाग पाडले. (अशा सतर्क हिंदूंचे अभिनंदन ! – संपादक)
श्री. प्रभाकर भोसले यांची पोस्ट पाहून भांडुप येथील हिंदुत्ववादी सचिन घाग हेही तेथे आले. त्यांच्या यकृतावर सूज आल्याने त्यांना तपासणीसाठी शीव येथे आधुनिक वैद्यांकडे जायचे होते; पण त्यांनी धर्मरक्षणाला प्राधान्य दिले. (अशा धर्मप्रेमी हिंदूंकडून अन्य हिंदूंनी बोध घ्यावा ! – संपादक) स्थानिक हिंदूंच्या दबावामुळे शेवटी पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याचे मान्य केले. तोपर्यंत रात्रीचे १०.३० वाजले होते.
या संपूर्ण प्रक्रियेत श्री. प्रमोद काटे यांच्यासह ‘शिवकार्य प्रतिष्ठान’चे श्री. प्रभाकर भोसले, भांडुप येथील हिंदुत्ववादी सचिन घाग, मुंबई सेंट्रल येथील धर्मजागरण संघटनेचे नगर संयोजक श्री. बिरजू वोरा, श्री. दिनेश साहू, धर्म जागरणचे सह संयोजक श्री. प्रफुल्ल चौहान, भाजपचे श्री. संजय कानुनगो, भाजप दक्षिण मुंबई युवा अध्यक्ष श्री. सन्नी सानप, अधिवक्ता श्री. रेड्डी उपस्थित होते.
संपादकीय भूमिकाअसे हिंदूसंघटन झाल्यास हिंदु धर्मावर आघात करणार्यांवर वचक बसेल ! |