‘१७ ते २१.११.२०२३ या कालावधीत सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे आयोजित केलेल्या ‘युवा साधना शिबिर २०२३’ साठी मला जाण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला पुढील अनुभूती आली.
कु. गंधर्व ठोंबरेएके दिवशी संध्याकाळी ७.४५ वाजता प्रायोगिक भाग चालू झाला. तेव्हा एक फुलपाखरू खिडकीतून आत आले. ते संपूर्ण सभागृहात फिरले आणि तेथे ठेवलेल्या श्रीकृष्णाच्या चित्रासमोरच लादीवर येऊन बसले. मी त्याच्याकडे एकटक पाहून निरीक्षण केले. तेव्हा मला असे जाणवले की, ते फुलपाखरू नामस्मरण करत बसले आहे. अनेकजण तेथून ये-जा करत होते; तरीसुद्धा ते उडून गेले नाही. रात्रीचे ८.१५ वाजले होते, तरीही ते फुलपाखरू शांतपणे तेथे नामजप करत बसले होते. कालांतराने माझ्या लक्षात आले, ‘अरे आपणही एकाग्रपणे नामजप करण्यास बसत नाही.’ आश्रमाच्या चैतन्यामुळे साधकच नव्हे, तर येथील प्राणी, पक्षी, किडे प्रत्येक जण साधना करत असतात. मी त्या फुलपाखराचे निरीक्षण करत होतो. रात्री ८.२७ वाजता ते फुलपाखरू उडाले आणि सभागृहात वेगळ्या ठिकाणी जाऊन बसले. ‘आश्रमात प्रत्येक जण स्थुलातून, तसेच सूक्ष्मातून साधना करत असतो’, हे मला शिकायला मिळाले.’
– कु. गंधर्व ठोंबरे (वय १७ वर्षे), भांडुप, मुंबई. (१६.१२.२०२३)
|