महाशिवरात्रीनिमित्त पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड येथे ४० हून अधिक ठिकाणी ग्रंथप्रदर्शन !

सात्त्विक उत्पादने आणि धर्मशिक्षण फलक यांच्या माध्यमातूनही अध्यात्मप्रसार अन् धर्मप्रसार !

कात्रज येथील काशी विश्वेश्वर मंदिरातील प्रदर्शनाला भेट देतांना श्री काशी विश्वेश्वर मंदिराचे अध्यक्ष श्री. सुधीर राजमाने, सामाजिक कार्यकर्ते आणि अधिवक्ते संभाजी राजे थोरवे

पुणे, १० मार्च (वार्ता.) – महाशिवरात्रीनिमित्त पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादनांचा कक्ष, ग्रंथप्रदर्शन, फ्लेक्स प्रदर्शन, फलक लेखन, प्रत्यक्ष आणि ऑनलाईन व्याख्याने, भित्तीपत्रके आदी माध्यमातून व्यापक स्तरावर धर्मप्रसार करण्यात आला.

वल्लभनगर येथील अजमेरा कॉलनी येथील शिवदत्त मंदिरातील प्रदर्शनाला भेट देतांना माजी नगरसेवक श्री. अर्जुन ठाकरे, मंदिराचे विश्वस्त आणि सभासद

पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे ४० हून अधिक ठिकाणी ग्रंथप्रदर्शने आणि सात्त्विक उत्पादने यांचे कक्ष उभारण्यात आले होते. या कक्षाला भाविक आणि जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक जिज्ञासूंनी संस्थेचे कार्य जाणून घेतले. शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणा का घालावी ? भगवान शिवाची उपासना कशी करावी ? शिवपिंडीवर बेल किती आणि कसा वहावा ? याविषयी फलक लेखनाच्या माध्यमातून धर्मशिक्षण देण्यात आले. ग्रंथप्रदर्शन आणि सात्त्विक उत्पादनांच्या कक्षाला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. पहाटेपासूनच प्रदर्शन कक्षाला प्रारंभ झाला.

राजगुरुनगर केंद्रातील सिद्धेश्वर मंदिर येथे ग्रंथप्रदर्शन कक्षावर जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांची सदिच्छा भेट

सद्गुरु संतांची वंदनीय उपस्थिती

हडपसर येथील नीलकंठेश्वर मंदिर, गावठाण येथील विश्वेश्वर मंदिर, तसेच अरणेश्वर येथील सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथप्रदर्शनाला सनातन संस्थेच्या सद्गुरु  स्वाती खाडये आणि सनातन संस्थेच्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांची वंदनीय उपस्थिती लाभली.


सासवड येथील वटेश्वर महादेव मंदिरातील कक्षाला भेट देतांना कात्रज येथील माजी नगरसेवक श्री. राजाभाऊ कदम

धायरी येथील धायरेश्वर मंदिर, जुनी सांगवी येथील महादेव मित्र मंडळ, कोथरूड येथील मृत्यूंजयेश्वर मंदिर, सासवड येथील वटेश्वर महादेव मंदिर, कात्रज येथील काशी विश्वेश्वर मंदिर, भोर तालुक्यातील नसरापूर येथील श्री बनेश्वर मंदिर, लोहिया उद्यान हडपसर येथील श्री चंद्र मौलेश्वर महादेव मंदिर, सदाशिव पेठ येथील श्री विश्वेश्वर मंदिर, महेश सोसायटी बिबवेवाडी येथील शिवमंदिर, हडपसर येथील नीलकंठेश्वर मंदिर, शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिर, थेरगाव येथील महादेव मंदिर, प्राधिकरण येथील मल्लिकार्जुन मंदिर, राजगुरुनगर येथील सिद्धेश्वर मंदिर, तळेगाव येथील सिद्धेश्वर मंदिर यांसह अनेक ठिकाणी पहाटेपासूनच प्रदर्शन कक्षाला सुरुवात झाली.


बिबवेवाडी येथील महेश सोसायटी येथील प्रदर्शन कक्षावर जिज्ञासूंना माहिती सांगतांना साधक

सराई पेठ जुन्नर येथील श्री विठ्ठल मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त प्रवचन घेण्यात आले. अनेक जिज्ञासूंनी याचा लाभ घेऊन शंकांचे निरसन करून घेतले.

सौ. शिवानी वाघ यांनी भगवान शंकराविषयी माहिती असणारे पत्रक प्रिंट काढून ठेवले होते, तसेच त्यांनी माहिती सांगून हस्तपत्रकेही वितरित केली.

शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिरातील कक्षावर उपस्थित तरुण जिज्ञासू

मंचर केंद्रातील तपनेश्वर येथे श्री. संजय शेठ थोरात आणि श्री. शंकर पटेल यांनी ग्रंथप्रदर्शनास भेट दिली, तसेच जांभळी डोंगर, डावजे येथील निळकंठेश्वर मंदिरातील कक्षाला नांदेड सिटी येथील स्वामी समर्थ मंदिराचे विश्वस्त श्री. नरसिंह लगड यांनी भेट दिली.