नवी देहली – ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या अध्यक्षा आणि ‘इन्फोसिस’ आस्थापनाचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेच्या खासदार म्हणून निवड केली आहे. सुधा मूर्ती लेखिका म्हणूनही जगभर प्रसिद्ध आहेत. त्या महिला आणि लहान मुले यांच्यासाठी काम करत आहेत. त्यांची संस्थादेखील यासाठी देशाच्या विविध भागांमध्ये काम करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट लिहून सुधा मूर्ती यांचे अभिनंदन केले आहे.
Sudha Murthy, the President of Infosys Foundation and wife of the establishment's co-founder, Narayan Murthy, has been nominated as a member of Rajya Sabha by the President.pic.twitter.com/dMXXWbyr2E
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 9, 2024
राज्यसभेवर झालेल्या निवडीवर सुधा मूर्ती यांनी म्हटले आहे की, मी सध्या भारतात नाही; परंतु महिला दिनानिमित्त मिळालेली ही मोठी भेट आहे. देशासाठी काम करण्यासाठी एक नवीन दायित्व मिळाले आहे.