‘शिवभक्त आणि श्रेष्ठ नर्तकी महानंदा हिने नृत्यकलेच्या माध्यमातून शिवाला प्रसन्न करून घेतले अन् त्याची कृपा संपादन केली. (श्रेष्ठ नर्तकी महानंदा हिचा उल्लेख ‘शिवलीलामृत’ या ग्रंथातील ११ व्या अध्यायात आणि ‘शिवपुराण’ या पौराणिक ग्रंथातील २६ व्या अध्यायात आहे.) तिने तिच्या संपूर्ण जीवनात नृत्यकला शिवचरणी अर्पण करून आध्यात्मिक उन्नती करून घेतली आणि तिला अखेरीस शिवलोकाची प्राप्ती झाली. अशा प्रकारे शिवभक्त महानंदाचे संपूर्ण जीवन शिवमय झाले होते.
वर्ष २०१३ मध्ये मला सूक्ष्मातून दिसले, ‘महानंदा शिवासाठी नृत्य करतांना तिला कविता स्फुरली.’ तिच्या मनातील ही कविता देवाच्या कृपेने माझ्या मनःपटलावर उमटली. देवाच्या कृपेने माझ्याकडून तिचे चित्र रेखाटले गेले. त्याचे लिखाण मी आता केले. ‘ही कविता शिवचरणी अर्पण होऊन आम्हा सर्व साधकांवर शिवाची कृपा होऊ दे’, हीच शिवचरणी प्रार्थना आहे.
हे पंचानन (पाच मुखे असलेला शिव ), तुझे चिंतन करते हे शिव नटेशन् ।
तुझेच कीर्तन आणि तुझेच अर्चन ।
तुझेच पूजन नि तुझ्यासाठीच नर्तन ।
तूच आहेस मोक्षाचे उत्तम साधन । (टीप १)
हे शिवशंकर नटेशन् ।। १ ।।
माझे तन, मन आणि लोचन ।
माझा प्रत्येक श्वास आणि संपूर्ण जीवन ।
तव चरणी नतमस्तक होते हे त्रिभुवन ।
कृपा करावी आम्हावर हे त्रिलोचन शिव नटेशन् ।। २ ।।
हे महादेवा, करते तव चरणी अर्पण ।
हे सत्यम् शिवम् सुन्दरम् ।
नृत्यरूपी कलेचे करूनी समर्पण ।
भावारती ओवाळते हे पंचानन शिव नटेशन् ।। ३ ।।
मनोमनी भक्तीचे बेलपत्र करूनी अर्पण ।
अर्चनभक्ती करते हे शिव नटेशन् ।
तुझ्या पंचाक्षरी मंत्राचे (टीप २) करूनी स्मरण ।
चित्त होते पावन, हे शिव नटेशन् ।। ४ ।।
टीप १ : ‘शिवभक्ती केल्याने मोक्षप्राप्ती होणार आहे’, असा महानंदाचा भाव आहे.
टीप २ : नमः शिवाय ।
सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४० वर्षे, सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.२.२०२४)
|