‘६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘निर्विचार’ हा नामजप ऐकत असतांना मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. नामजप चालू झाल्यावर आरंभीची काही मिनिटे मी सेवा आणि अन्य कृती करत होते. तेव्हापासूनच ‘मी एका पोकळीत जात आहे’, असे मला जाणवत होते.
२. नंतर मी डोळे बंद करून नामजप ऐकत होते. तेव्हा ‘मी पोकळीत जात आहे’, असे मला तीव्रतेने जाणवत होते.
३. मला शांतीची अनुभूती येत होती. ‘मला चैतन्य मिळत आहे’, असेही मला जाणवले.
४. मला नामजप ऐकतांना जरा गरगरल्यासारखे झाले. त्याकडे लक्ष गेल्यावर ‘आता डोळे उघडूया अन् नामजप ऐकायला नको’, असे मला वाटले.
५. ‘मी पोकळीत जात आहे’, याकडे माझे लक्ष गेले की, ‘मला नामजप ऐकत रहावा’, असे वाटत होते.
६. नामजप ऐकतांना माझे मन निर्विचार झाले होते.’
– सौ. नमिता पात्रीकर, फोंडा, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |