‘शाहजहापूर (उत्तरप्रदेश) येथील सफोरा गावात विनोद सिंह यांच्या १३ वर्षांच्या पूजा नावाच्या मुलीला स्वप्नात भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिले, तसेच एका भूमीत देवाची मूर्ती पुरण्यात आल्याचे सांगितले. त्यानुसार पूजाच्या कुटुंबियांनी त्या ठिकाणी उत्खनन केले असता भगवान श्रीकृष्णाची मूर्ती सापडली. पूजाने जेव्हा कुटुंबियांना भगवान श्रीकृष्णाने स्वप्नामध्ये मूर्तीविषयी माहिती दिल्याचे सांगितले, तेव्हा त्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे पूजाने १० दिवस खाणे-पिणे बंद केले. शेवटी घरच्यांना पूजाचे म्हणणे मान्य करावे लागले.’
(१९.२.२०२४)