रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. प्रतीक्षा हडकर यांना ‘कमला यागा’च्या वेळी आलेल्या अनुभूती

२४.१०.२०२३ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात महर्षींच्या आज्ञेनुसार ‘कमला याग’ करण्यात आला. त्या वेळी कु. प्रतीक्षा हडकर यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

कु. प्रतीक्षा हडकर

१. यागाला आरंभ होण्यापूर्वी

यागाला आरंभ होण्यापूर्वीच मला पुष्कळ उष्णता जाणवत होती; पण माझ्या मनाला चांगले वाटत होते.

२. यागाच्या वेळी

अ. माझे मन निर्विचार आणि एकाग्र होते.

आ. मला मधे मधे सुगंध येत होता.

इ. महापूर्णाहुतीच्या वेळी मला वातावरणात थंडावा जाणवत होता.

३. देवीचे यंत्र पहातांना आलेल्या अनुभूती

अ. यंत्र पहातांना मला शक्ती जाणवत होती आणि माझे मन स्थिर अन् शांत होते.

आ. मला अनाहतचक्राच्या ठिकाणी थंडावा जाणवत होता.

इ. ‘तेथे देवीचे यंत्र नसून देवीच विराजमान झाली आहे’, असे मला जाणवत होते. मधे मधे मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ दिसत होत्या.

४. सुश्री तेजल पात्रीकर गायन सेवा करत असतांना आलेली अनुभूती

४ अ. सुश्री तेजल पात्रीकर गायन सेवा करत असतांना ‘गायन संपूच नये’, असे वाटणे : सुश्री तेजल पात्रीकर (वय ४६ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, संगीत विशारद) यांनी ‘जगत् जननी, जगत् कल्याणी ….’, हे भक्तीगीत गाण्यास आरंभ केल्यानंतर वातावरणात उत्साह जाणवत होता. माझ्या अंगावर शहारे येत होते. ‘गायन संपूच नये’, असे मला वाटत होते. ‘तेजलताई जणू आईला (देवीला) कळवळून हाक मारत आहे आणि आई हाकेला धावून येणारच’, असे मला जाणवत होते. यासंदर्भात मी तेजलताईला सांगितल्यावर ती मला म्हणाली, ‘‘हो. मला आतून असेच वाटत होते.’’

– कु. प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१०.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक