ठाणे, ३१ डिसेंबर (वार्ता.) – मुंब्रा येथील महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीजवळ अमली पदार्थ घेऊन एक जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दिलावर हुसेन खान (वय ४८ वर्षे) याची झडती घेतली. तेव्हा त्याच्याजवळ ३०.५ ग्रॅम वजनाचा एम्डी (मेफेड्रॉन) क्रिस्टल पावडर हा अमली पदार्थ सापडला. पोलिसांनी त्याच्याकडील भ्रमणभाष संच, दुचाकी आणि रोख असा एकूण २ लाख ८६ सहस्र ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दिलावर हुसेन खान याला पोलिसांनी अटक केली असून पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत. (गुन्हेगारीत बहुसंख्यांक असलेले धर्मांध ! – संपादक)
संपादकीय भूमिकाअमली पदार्थाच्या गुन्हेगारीत धर्मांधच नेहमी पुढे असतात, हे लक्षात घ्या ! |