|
ठाणे, ३० डिसेंबर (वार्ता.) – अंबरनाथ (पश्चिम) येथे हिंदूबहुल लोकवस्ती असलेल्या बुवापाडा परिसरात अनधिकृतरित्या ‘ग्लोरी प्रार्थना भवन’ हे चर्च उभारण्यात आले होते. येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. कमलेश गुप्ता यांच्या प्रयत्नांमुळे हे अनधिकृत ख्रिस्ती प्रार्थनास्थळ बंद करण्यात आले आहे. (हिंदु धर्मियांवर होणारे आघात रोखण्यासाठी प्रत्यक्ष कृती करणारे श्री. कमलेश गुप्ता यांचे अभिनंदन ! श्री. गुप्ता यांच्यासारखे हिंदुत्वनिष्ठ, हीच हिंदु धर्माची खरी शक्ती आहे ! – संपादक)
१. गरजू हिंदूंना प्रार्थनेसाठी एकत्र आणून, तसेच त्यांना विविध प्रलोभने दाखवून ‘ख्रिस्ती धर्म कसा योग्य आहे ?’ हे सांगितले जात होते आणि त्याद्वारे हिंदूंचे धर्मांतर केले जात होते. अशा घटना ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत घडल्या आहेत.
२. यावर हिंदुत्वनिष्ठ कमलेश गुप्ता यांनी ‘हिंदूबहुल वस्तीमध्ये चर्चची आवश्यकता काय ? तसेच चर्चसाठी अंबरनाथ नगरपरिषद आणि अंबरनाथ पोलीस ठाणे यांची अनुमती घेतली आहे का ? याची चौकशी करावी’, अशी तक्रार अंबरनाथ पोलीस ठाणे आणि ठाणे पोलीस आयुक्त यांच्याकडे ऑनलाईन माध्यमातून केली.
३. त्यांच्या तक्रारीची नोंद घेत अंबरनाथ पोलिसांनी ‘ग्लोरी प्रार्थना भवन’ चर्चचे अध्यक्ष जेम्स कुंजकुज (वय ६० वर्षे) यांना बोलवून चौकशी केली. त्यांनी धर्मादाय आयुक्त, तसेच कोणतीही अनुमती घेतली नसल्याचे अन्वेषणात निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना सी.आर्.पी.सी. १४९ प्रमाणे नोटीस बजावून हे अनधिकृत चर्च कायमस्वरूपी बंद केले आणि तसे कमलेश गुप्ता यांना कळवले.
संपादकीय भूमिकाअशी अनधिकृत चर्च उभी रहातातच कशी ? पोलीस आणि प्रशासन यांचे त्यावर नियंत्रण कसे नाही ? |