दुचाकींची चोरी करणार्‍यांना अटक !

जळगाव – अनेक जिल्ह्यांतून दुचाकींची चोरी करणार्‍यांना पोलिसांनी अटक केली आहे. या वेळी ९ दुचाकी कह्यात घेण्यात आल्या. यात प्रमुख सूत्रधारासह तिघांना अटक केली असून यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. या सर्वांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.