हमासला गाडल्याविना थांबू नका ! – डॉ. सुरेंद्र जैन, संयुक्त महामंत्री, विश्‍व हिंदु परिषद

विश्‍व हिंदु परिषदेचा इस्रायलला पाठिंबा !

मुंबई – जागतिक पातळीवर मुसलमान गैरमुसलमानांना त्रास देत आहेत. भारतात हिंदु शत्रू असेल, तर पाश्‍चात्त्य जगात ख्रिस्ती आणि ज्यू त्यांच्यासाठी शत्रू आहेत. हमासने गेल्या काही दिवसांत जो अत्याचार, नरसंहार चालवला आहे, तो मानवतेला काळिमा फासणारा आहे. विश्‍व हिंदु परिषद इस्रायलच्या पाठीशी उभी आहे. ‘जोपर्यंत एकेक जिहादी ठेचत नाही, अशा हमासला गाडल्याविना थांबू नका, असे आवाहन विश्‍व हिंदु परिषदेचे संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आणि विश्‍व हिंदु परिषदेचे हिरक महोत्सवी वर्ष या निमित्ताने बजरंग दलाकडून सिंधुदुर्ग ते मुंबई अशा शिवशौर्य यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेच्या समारोपाच्या प्रसंगी ते बोलत होते.

या वेळी महामंडलेश्‍वर स्वामी विश्‍वेश्‍वरानंद गिरीजी महाराज, अभिनेते राहुल सोलापूरकर, ह.भ.प. जयेश महाराज भाग्यवंत, लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) मनोजकुमार सिन्हा, लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) जगदीप सिंह मनचंदा, भजनसम्राट अनुप जलोटा, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त आदी मान्यवर, तसेच बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सुरेश जैन पुढे म्हणाले,…

१. काही लोक ‘हमास’चे समर्थन करून मुसलमान मतपेटी गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. हेच लोक पुढे पाकिस्तानचेही उघडपणे समर्थन करतील.

२. जगभरातील मुसलमान समाज हमासच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने उभा आहे, हे दुर्दैवी आहे. स्त्रियांवर अत्याचार करणे, मंदिरे उद्ध्वस्त करणे, हे षड्यंत्र शतकानुशतके वापरले जात असून हे प्रकार मागील १ सहस्र ४०० वर्षांपासून होत आहेत.

३. नवरात्रीच्या काळात जिहादी वृत्तीची माणसे गरबा कार्यक्रमात शिरून स्त्रियांना लक्ष्य करतात आणि त्याद्वारे लव्ह जिहादला बळी पाडतात. यामुळे गरबा खेळण्यासाठी येणार्‍यांचे आधारकार्ड तपासा. त्यांच्या कपाळावर टिळा लावा. हातात रक्षाकवच (दोरा) बांधा. देवीची भक्ती न करणारी एकही व्यक्ती मंडपात शिरू नये, हे तुमचे दायित्व आहे.