पुणे – ग्रामीण पोलीस दलात भरती होण्यासाठी प्रकल्पग्रस्त असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर करणार्या १० उमेदवारांवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. या संदर्भात पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस उपअधीक्षक युवराज मोहिते यांनी तक्रार दिली.
पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान मैदानी चाचणी, लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना रुजू होण्यापूर्वी त्यांनी भरती प्रक्रियेदरम्यान सादर केलेली शैक्षणिक आणि इतर कागदपत्रे पडताळणीनंतर समांतर आरक्षणासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे अन् प्रमाणपत्रे पडताळणी करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय (पुनर्वसन) यांना पाठवली होती. या १० जणांना बीड कार्यालयातून अशा प्रकारे प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र दिले नसल्याचे सांगितले. त्यामुळे पुणे पोलीस ग्रामीण दलात रुजू होण्यासाठी शासनाची फसवणूक करून स्वतःच्या लाभासाठी बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देणार्या पुणे ग्रामीण पोलीस दलातील १० उमेदवारांवर गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचे पुढील अन्वेषण साहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव करत आहेत
संपादकीय भूमिकावैयक्तिक स्वार्थासाठी नीतिमत्ता पायदळी तुडवणारे हे उमेदवार पोलीसदलासाठी कलंक आहेत ! |