सवा ५ लाख रुपये गमावले !
मुंबई – ‘गरबा क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणार्या फाल्गुनी पाठकच्या दांडियाच्या पासचे आमीष दाखवून १५६ तरुणांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यांना सवा ५ लाख रुपये गमवावे लागले आहेत. आरोपीने स्वस्तात पास देण्याचे आमीष दाखवून या तरुणांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी तरुणांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे.
बोरिवली (पश्चिम) येथील फाल्गुनी पाठकच्या कार्यक्रमाचा अधिकृत विक्रेता असल्याचा दावा करणारा विशाल शाह स्वस्तात पास देत असल्याची माहिती कांदिवलीतील एका तरुणाला मिळाली. हे पास ४ सहस्र ५०० रुपयांऐवजी ३ सहस्र ३०० रुपयांना मिळणार असल्याचे तक्रारदाराला समजले. त्यामुळे तक्रारदार तरुण त्याचे मित्र पास खरेदी करण्यासाठी सिद्ध झाले. शहाने सांगितल्याप्रमाणे एका व्यक्तीकडे त्या सर्वांनी पैसे दिले. त्या व्यक्तीने एका ठिकाणचा पत्ता देऊन तेथून पास घेण्यास सांगितले. प्रत्यक्षात पत्त्यामध्ये उल्लेख केलेली इमारत त्यांना सापडलीच नाही.
संपादकीय भूमिकाआमिषांना बळी न पडता सतर्क राहून आर्थिक व्यवहार करा ! |