इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या संसदीय समितीने बलात्कार्यांना भर चौकात फाशी देण्याच्या संदर्भातील विधेयक संमत केले आहे. जमात-ए-इस्लामी पक्षाचे खासदार मुश्ताक अहमद यांनी हे विधेयक सादर केले होते.
Senate committee passes bill proposing public hangings for #rapists in Pakistan, sparking intense debate on capital punishment and deterrence. 🇵🇰 #Justice #Islamabad #Pakistan #Peshawar #petrolprice pic.twitter.com/K5Y44yrMSE
— unicornstep (@unicornstep1) September 30, 2023
या विधेयकाला पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षाच्या खासदार शेरी रहमान यांनी विरोध केला. त्या म्हणाल्या की, अनेक सभ्य समाजाने फाशीची शिक्षा देणे रहित केले आहे. अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी फाशी देण्यात येऊ नये. या घटनेमुळे सामाजिक हिंसाचारात वाढ होऊ शकते.
संपादकीय भूमिकापाकिस्तान असा कायदा करू शकतो, तर भारत का करू शकत नाही ? |