‘सप्टेंबर २०२१ मध्ये सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ‘श्री गणेशाय नमः ।’ आणि ‘ॐ गं गणपतये नमः ।’ हे गणपतीचे तारक रूपातील नामजप ध्वनीमुद्रित करण्यात आले. दोन्ही नामजप सप्टेंबर मासात प्रतिदिन १० मिनिटे आश्रमातील ध्वनीवर्धकावर साधकांना ऐकवण्यात आले. ‘ते नामजप ऐकून काय अनुभूती येतात ?’, हे लिहून देण्यास सांगण्यात आले. या संदर्भात मला आलेल्या अनुभूती येथे देत आहे.
२. ‘श्री गणेशाय नमः ।’ आणि ‘ॐ गं गणपतये नमः ।’ या दोन्ही नामजपांच्या वेळी जाणवलेली सामायिक सूत्रे
अ. आरंभी माझी चंद्रनाडी कार्यरत होती.
आ. दोन्ही नामजपांना आरंभ झाल्यावर माझी भावजागृती झाली.
इ. नामजपाची स्पंदने मला मूलाधारचक्रावर जाणवू लागली. तेव्हा माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.
ई. माझी कुंडलिनीशक्ती जागृत झाली आणि ती सुषुम्ना नाडीतून वर चढून सहस्रारचक्रापर्यंत पोचली.
ऊ. माझे ध्यान लागले.
– (सद़्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१९.९.२०२१)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |