खोट्या प्रचाराद्वारे समाजात भेद निर्माण करू पहाणारे साम्‍यवादी !

साम्‍यवादी लेखक देवदत्त पटनायक यांनी ‘बिझनेस टीव्‍ही’वर मांडलेल्‍या सूत्रांचे खंडण

सौजन्य : Business Today

‘जेव्‍हा ‘आपलेच म्‍हणणे खरे’, असे अहंभावी विचार असतात आणि प्रत्‍यक्षात ते खरे नसतात, तेव्‍हा शब्‍दच्‍छल करून ते खरे करण्‍याच्‍या नादात काही तथाकथित स्‍वयंघोषित विद्वान तोंडघशी पडतात. त्‍यांचा दुतोंडीपणा उघडा पडत असतो. हे ‘भारत’ आणि ‘इंडिया’ या दोन शब्‍दांच्‍या संदर्भात ‘बिझनेस टीव्‍ही’वरील एका चर्चेत साम्‍यवादी लेखक देवदत्त पटनायक यांनी मांडलेल्‍या सूत्रांतून आपल्‍याला निश्‍चित शिकायला मिळेल.

हिंदूंनी त्‍यांच्‍या धर्मग्रंथांचा अभ्‍यास केलेला नाही. त्‍यांच्‍यात हिंदु धर्मावर वैचारिक आघात करणार्‍यांच्‍या विचारांची सत्‍यता पडताळण्‍याची तळमळ आणि त्‍यांचे वैचारिक षड्‍यंत्र उघडे पाडण्‍याची विजिगीषु वृत्ती यांचा अभाव आहे. त्‍यामुळे अशा साम्‍यवादी धर्मविरोधी विचारकांचे चांगलेच फावते. १८ सप्‍टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात ‘एक प्रकारे साम्‍यवाद्यांना चपराक आणि साम्‍यवादी, धर्मनिरपेक्षतावादी आणि सुधारकांचा जातीयवाद यांपासून समाज अन् देश यांना सर्वाधिक धोका’ यांविषयीची सूत्रे वाचली. आज लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/720830.html

टीका ३

भारतातील ब्राह्मणांनी आपल्‍या भूमीतील साहित्‍यावर नियंत्रण मिळवले आहे. ‘आर्य’ हा शब्‍द ब्राह्मणांकडून आला आहे; पण जैन आणि बौद्ध आर्यांकडे हिंदूंच्‍या तुलनेत अगदी वेगळ्‍या दृष्‍टीने पहातात. ब्राह्मणांकडून ‘भारत’ या शब्‍दाचा वापर जैन परंपरेतून केलेला आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍यापासून आपण अत्‍यंत सावध असले पाहिजे.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

खंडण : साम्‍यवादी तथाकथित विचारकांचे सर्व विश्‍लेषण ब्राह्मणद्वेषीच !

अ. ‘आर्य’ शब्‍द ब्राह्मणांनी आणलेला आहे, ब्राह्मणांचा आहे’, असे आपण अभ्‍यासपूर्ण (?) मत मांडले. मराठीत ‘उचलली जीभ अन् लावली टाळ्‍याला’, अशी एक म्‍हण आहे. हा प्रकारही तसाच वाटतो. सध्‍या हिंदूंमध्‍ये धर्माचा अभ्‍यास करण्‍याच्‍या प्रवृत्तीचा अभाव, हा साम्‍यवाद्यांच्‍या खोट्या प्रचाराचा आधारस्‍तंभ झाला आहे. आपण ज्‍या वेदांच्‍या आधारे ‘इंडिया’ या शब्‍दाचे समर्थन करत होता, अगदी त्‍याच वेदांच्‍या आधारे ‘आर्य’ शब्‍दही आहे.

आ. ‘आर्य’ हा शब्‍द ब्राह्मणांचा म्‍हटले की, लगेच साम्‍यवादी विकाऊ प्रसारमाध्‍यमे तुम्‍हाला डोक्‍यावर घेतात. अशा वेळी समोरचे हिंदू ‘आता ब्राह्मणवादाचे समर्थन केल्‍यासारखे होईल किंवा ‘ब्राह्मणांचे समर्थक’ असा शिक्‍का बसेल; म्‍हणून गप्‍प बसतात. असे असले, तरी ‘कृण्‍वन्‍तो विश्‍वमार्यम् । – ऋग्‍वेद, मण्‍डल ९, सूक्‍त ६३, ऋचा ५ (अर्थ : संपूर्ण जगाला आर्य (सुसंस्‍कृत) करू.)’, हे घोषवाक्‍य आलेले आहे. सोयिस्‍करपणे वेदांचा उपयोग आपले म्‍हणणे खरे करण्‍यासाठी करायचा, तसेच सोयिस्‍करपणे वेदांतील अन्‍य गोष्‍टी ज्‍या आपल्‍याला अनुकूल नाहीत, त्‍यांना ब्राह्मणांवर थोपवून ब्राह्मण अन् अब्राह्मण असा वाद उकरून काढून आपल्‍या ‘फोडा, झोडा आणि राज्‍य करा’, या नीतीचा वापर आपल्‍यासह सर्व तथाकथित साम्‍यवादी विचारक करत असतात. हे साम्‍यवादी ब्राह्मण जे धर्मद्वेषाचे प्रतिनिधित्‍व करतात, त्‍याचे उत्तम उदाहरण होय.

इ. ‘हिंदूंमध्‍ये जातीयवाद आहे’, हा आरोप तात्‍कालिक मान्‍य केला, तरीही या साम्‍यवादी तथाकथित विचारकांचे सर्व विश्‍लेषण ब्राह्मणद्वेषी असते, हे सत्‍य वारंवार उघड होत आहे. बुद्धीची क्षमता अर्पण करून अध्‍ययन आणि अध्‍यापन करणारे कार्य ब्राह्मण वर्णात मोडते. त्‍यामुळे सनातन धर्माप्रमाणे देवदत्त पटनायक हे वर्णानुसार ब्राह्मणच आहेत. (भारत सरकारच्‍या नोंदीनुसार ते जातीनुसार ब्राह्मण आहेत कि नाहीत ? हे तेच सांगू शकतील.); कारण सनातन धर्म गुणकर्मानुसार ४ वर्ण सांगतो. तो जाती सांगत नाही. अगदी याच धर्तीवर नेहरू आणि डॉ. आंबेडकर यांनी भारतात ४ वर्गांनुसार (४ क्‍लास – क्‍लास १, क्‍लास २, क्‍लास ३, क्‍लास ४) नोकरीव्‍यवस्‍था निर्माण केली आहे. जाती कुठून निर्माण झाल्‍या ? ते शोधण्‍यापेक्षा भारत सरकारने जातींची नोंदणी बंद करून केवळ सर्वांचा कागदोपत्री धर्म विचारल्‍यास (धर्मनोंदी केल्‍यास) भारतातून जातीनिर्मूलन करणे सहज शक्‍य आहे.

एकूणच भारतातील ब्राह्मणांविषयी साम्‍यवादी तथाकथित सुधारक आणि विद्वान ज्‍या पद्धतीने द्वेषपूर्वक अन् सूडबुद्धीने वक्‍तव्‍य करत आहेत, ते हिंदूंतील जातीयवादापेक्षा साम्‍यवादी, सुधारक आणि धर्मनिरपेक्षवादी लोकांचा हिंदु धर्माविषयी द्वेष, सूडभावना अन् ब्राह्मणद्वेष हा मानवतेला काळीमा फासणारा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

ई. यावरून समाज आणि देश यांना सर्वाधिक धोका साम्‍यवादी, धर्मनिरपेक्षतावादी तथा सुधारकांचा जातीयवाद यांपासून आहे. त्‍यांची धोकादायक ब्राह्मणद्वेषाआडूनची ही हिंदुद्वेषी वृत्ती भारतातील चर्चित जातीयवादाहून भयंकर आहे. त्‍यामुळे आज ‘सनातन धर्मालाच नष्‍ट केले पाहिजे’, असे उघड वक्‍तव्‍य करण्‍याचे धाडस मंत्रीपदावरील किंवा राजकीय पक्षाचे उत्तरदायी नेते करत आहेत. एकूणच ख्रिस्‍ती किंवा इस्‍लाम यांच्‍या समर्थनाच्‍या छुप्‍या धोरणासाठी तथाकथित साम्‍यवादी, धर्मनिरपेक्षतावादी आणि सुधारक यांनी ब्राह्मणद्वेषाचे शस्‍त्र घेऊन हिंंदूंना नष्‍ट करण्‍यासाठी हा लढा उभारल्‍याचे दिसून येते.

खरेतर देवदत्त पटनायक हे कदाचित् स्‍वतःला साम्‍यवादी ब्राह्मण म्‍हणवतील, ज्‍यांनी साम्‍यवादी साहित्‍य आणि विचार यांवर नियंत्रण मिळवले आहे. ज्‍यांनी हे विचार आणि साहित्‍य यांद्वारे ब्राह्मणद्वेषाच्‍या आडून हिंदु धर्म नष्‍ट करण्‍याचा विडा उचलला आहे, जे बुद्धीच्‍या माध्‍यमातून समाज अन् राष्‍ट्र यांची सेवा करतात, ते म्‍हणजे ब्राह्मण; परंतु बुद्धी असली, तरी ती सुबुद्धी कि कुबुद्धी ? यांची चर्चा होणारच. साम्‍यवादी ब्राह्मण त्‍यांची कुबुद्धी वापरून समाजाला भ्रमित करून एक प्रकारे समाज आणि राष्‍ट्र नष्‍ट करण्‍याचा प्रयत्न करत आहेत. त्‍यामुळे रामरूपी अवतारी पुरुष या अधर्म विचारांचे निर्दालन करून परत धर्मराज्‍याची स्‍थापना करतील, हे निश्‍चित !’

(क्रमशः)

– (सद़्‍गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्‍ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (८.९.२०२३)