नाशिक येथील महापालिकेच्‍या शाळांमध्‍ये शिक्षकांना भ्रमणभाष वापरास बंदी !

नाशिक – येथील महापालिकेच्‍या शिक्षण विभागाने शाळेमध्‍ये भ्रमणभाष बंदीचा निर्णय घेतला आहे. यामुळे शिक्षकांना शाळेत इतर कामांसाठी भ्रमणभाष वापरता येणार नाही. शहरातील पालिकेच्‍या १०० हून अधिक शाळांमध्‍ये शिक्षकांच्‍या भ्रमणभाष बंदीच्‍या संदर्भात निर्णय घेण्‍यात आला आहे. शाळेत आल्‍यानंतर शिक्षकांना त्‍यांचा भ्रमणभाष जमा करावा लागणार आहे. अतीतातडीचे असल्‍यास तो वापरण्‍याची अनुमती देण्‍यात आली आहे; पण त्‍यासाठी मुख्‍याध्‍यापकांची अनुमती घ्‍यावी लागणार आहे.