कोंढवा (पुणे) येथे केलेल्‍या कारवाईत ६ गोवंशियांची सुटका !

(प्रतिकात्मक चित्र)

पुणे – माळवाडीमधून कोंढवा येथे ३ सप्‍टेंबरला रात्री ७ ते ८ गोवंशियांची कत्तलीसाठी वाहतूक होणार असल्‍याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्‍यानुसार पोलिसांच्‍या साहाय्‍याने त्‍या ठिकाणी धाड टाकली असता एका पत्र्याच्‍या शेंडमध्‍ये २ देशी गोवंश, ३ वासरे आणि १ म्‍हशीचे पारडे चारा-पाण्‍याची कोणतीही सोय न करता आढळून आले. पोलिसांच्‍या साहाय्‍याने गोवंशियांची सुटका करण्‍यात आली आहे.

दुसर्‍या एका घटनेमध्‍ये रावणगाव, दौंड, पुणे येथे ९ सप्‍टेंबर या दिवशी अल्‍टो गाडीमध्‍ये गायींची नवजात वासरे कत्तलीसाठी घेऊन जातांना पकडली आहेत. गाडीचालक गाडी सोडून पळून गेला. पोलिसांच्‍या साहाय्‍याने गाडी रावणगाव पोलीस ठाण्‍यात जमा केली आहे. या प्रकरणी मंगेश चिमकर यांनी तक्रार दिली आहे.

संपादकीय भूमिका :

राज्‍यात गोवंश हत्‍याबंदी असूनही कायद्याची कडक कार्यवाही होत नसल्‍यानेच सर्वत्र गोहत्‍या होऊन गोमांसाची अवैध वाहतूक चालू आहे !