सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी शिकवलेल्‍या स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाच्‍या प्रक्रियेचे महत्त्व !

सर्व साधकांचा आधार असेलेले सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘एका विदेशी विचारवंताने म्‍हटले आहे, ‘जेव्‍हा तुम्‍ही मरण पावता, तेव्‍हा ‘तुम्‍ही मेले आहात’, हे तुम्‍हाला कळत नाही. त्‍याचे दुःख इतरांना होते. असेच मूर्ख माणसाच्‍या संदर्भात घडते. (When you are dead, you don’t know you are dead. The pain is felt by others. The same thing happens when you are stupid.)’ याप्रमाणेच ‘मृत्‍यू पावलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या पार्थिवाच्‍या संवेदना नष्‍ट झाल्‍यामुळे त्‍याला कशाचीच जाणीव नसते. ‘आपण जिवंत आहोत, सुखी आहोत कि दुःखी आहोत ?’, याची त्‍याला जाणीव नसते; परंतु इतरांना त्‍याची जाणीव असल्‍याने त्‍यांना वेदना होतात, तसेच एखादा मूर्ख माणूस अयोग्‍य बोलतो किंवा वागतो, त्‍या वेळी त्‍याला त्‍याविषयी काहीच संवेदना होत नाहीत; मात्र इतरांना त्‍या होतात.

पू. शिवाजी वटकर

विचारवंताने सांगितल्‍याप्रमाणे ‘आपण जिवंत असतांनाच मृत किंवा मूर्ख माणसासारखे होऊन सुख-दुःखाच्‍या संवेदना कशा नष्‍ट करायच्‍या ?’, हा प्रश्‍न आहे. हे केवळ साधना केल्‍याने शक्‍य होऊ शकते. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्‍या ‘गुरुकृपायोगा’नुसार साधनेच्‍या अंतर्गत स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाच्‍या प्रक्रियेमुळे साधकाला वरील सूत्रात सांगितल्‍याप्रमाणे स्‍थिती सहजपणे गाठता येते. साधनेच्‍या या प्रक्रियेमुळे साधकांमध्‍ये अहंशून्‍यता आल्‍यावर व्‍यावहारिक दृष्‍टीने तो इतरांसाठी मृत किंवा मूर्ख असू शकतो; परंतु अशा साधकाच्‍या सुख-दुःखाच्‍या संवेदना नष्‍ट होऊन त्‍याला केवळ आनंद मिळतो आणि इतरांना मात्र त्‍यांच्‍या स्‍वभावदोषांनुसार सुख-दुःख होते.

आनंदी जीवनासाठी साधना शिकवून साधकांना आनंद देणार्‍या सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या चरणी मी शरणागतभावाने कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.६.२०२३)