मुंबई – भारतीय पोलीस सेवेतील माजी अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर ‘फोन टॅपिंग’ प्रकरणात नोंदवण्यात आलेले गुन्हे मुंबई उच्च न्यायालयाने रहित केले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुणे आणि मुंबई येथे गुन्हे नोंदवण्यात आले होते.
#BigBreaking फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा; हायकोर्टाकडून IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध नोंदवलेले दोन्ही #FIR रद्द #RashmiShukla https://t.co/FzUOpuMfw0 pic.twitter.com/oJUt4eRBGn
— ABP माझा (@abpmajhatv) September 8, 2023
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना रश्मी शुक्ला राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. या कालावधीत काँग्रेसचे नेते नाना पटोले, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी त्यांचे ‘फोन टॅपिंग’ करण्यात आल्याचा आरोप केला होता. नाना पटोले यांच्या प्रकरणी पुणे येथे, तर एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांच्या प्रकरणी मुंबई येथे गुन्हे नोंद झाले होते. पुणे येथील गुन्हाप्रकरणी पोलिसांनी न्यायालयात ‘क्लोजर रिपोर्ट’ (अन्वेषण बंद करण्याविषयी अहवाल) सादर केला होता, तर मुंबईत नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांप्रकरणी राज्य सरकारने खटला चालवण्यास नकार दिला होता.