विरोधाला न जुमानता वर्ष २०२५ मध्‍ये हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना होणार, ही काळ्‍या दगडावरची रेघ !

१. ‘हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना व्‍हावी’, ही हिंदूंची जुनी मागणी

‘सध्‍या नागरिकांकडून ‘हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करा’, ही मागणी जोर धरत आहे; पण त्‍याला पुरोगामी, धर्मांध आणि राज्‍यघटनेचा जयजयकार करणारे यांचा विरोध होत आहे. भारत हे मूलतः हिंदु राष्‍ट्रच आहे. अनादी काळापासून, म्‍हणजे ख्रिस्‍तपूर्व सहस्रो वर्षांपासून ते हिंदु राष्‍ट्रच होते. येथे अनेक पराक्रमी राजांचे साम्राज्‍य होते, जे खर्‍या अर्थाने सम्राट आणि चक्रवर्ती होते. त्‍यानंतर ख्रिस्‍ती, मुसलमान आदी नवीन पंथ उदयास आले. हिंदु धर्म हा अनादी काळापासून आहे आणि तो पुढेही रहाणार आहे. मुसलमान आणि ख्रिस्‍ती पंथियांनी साम, दाम, दंड, भेद अशा युक्‍त्‍या वापरून धर्मांतरे केली, तरीही हिंदु धर्म टिकून आहे. हिंदु राष्‍ट्राची मागणी आजच होते, असे नाही. ‘धर्माच्‍या आधारावर मुसलमानांना वेगळे पाकिस्‍तान दिले, तेव्‍हाच भारत हिंदु राष्‍ट्र घोषित व्‍हावे’, असे हिंदूंना वाटत होते. कालांतराने धर्माच्‍या आधारावर बांगलादेश हे राष्‍ट्र उदयास आले. दोन्‍ही देशांनी पहिल्‍या दिवसापासून त्‍यांना मुसलमान राष्‍ट्र घोषित केले. तेव्‍हापासून तेथे रहाणार्‍या अल्‍पसंख्‍यांक हिंदूंवर अनन्‍वित अत्‍याचार होत आहेत.

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुसलमानांविषयी स्‍पष्‍टोक्‍ती !

फाळणीच्‍या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होते, ‘पाकिस्‍तानमधून सर्व हिंदूंना परत बोलवावे आणि भारतातील सर्व मुसलमानांना पाकिस्‍तानात पाठवावे, अन्‍यथा तुमच्‍या स्‍वतंत्र राष्‍ट्राला काही आधार रहाणार नाही.’ त्‍यांनी स्‍पष्‍टपणे सांगितले होते, ‘‘धर्मांधांना या देशाविषयी काही प्रेम नाही. त्‍यांच्‍या दृष्‍टीने हा देश दुय्‍यम असून त्‍यांचा पंथ आणि लोक हेच महत्त्वाचे आहेत.’’ पानिपतचे तिसरे युद्ध जर बघितले, तेथेही ऐनवेळी धर्मांधांनी अब्‍दालीलाच साहाय्‍य केले. विश्‍वासघात, गद्दारी आणि राष्‍ट्रद्रोह त्‍यांच्‍या रक्‍तातच आहे.

३. मान्‍यवरांनी व्‍यक्‍त केलेली हिंदु राष्‍ट्राची अपरिहार्यता !

‘भारताला हिंदु राष्‍ट्र घोषित करा’, असे स्‍वातंत्र्यवीर सावरकर स्‍पष्‍ट शब्‍दांत सांगायचे. त्‍यांनी वर्ष १९२३ मध्‍ये ‘हिंदुत्‍व’ हे पुस्‍तक लिहिले. त्‍या काळात देशाच्‍या स्‍वातंत्र्यासाठी बलीदान केलेल्‍या सर्वांची हीच इच्‍छा होती, ‘भारत हे हिंदु राष्‍ट्र व्‍हावे.’ काही दशकांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ‘हिंदु राष्‍ट्र स्‍थापन झाले पाहिजे’, असे स्‍पष्‍टपणे सांगितले. त्‍यांनी हिंदूंना न्‍याय मिळवून देण्‍याचाही प्रयत्न केला. तत्‍कालीन शासनकर्त्‍यांकडून मोठ्या प्रमाणात होणारे मुसलमानांचे लांगूलचालन हिंदूंना सहन झाले नाही. त्‍यामुळे त्‍यांनी वर्ष २०१४ मध्‍ये प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ नेतृत्‍व असणारे नरेंद्र मोदी पंतप्रधानांच्‍या रूपात भारताला दिले.  तेव्‍हापासून प्रत्‍येक हिंदूला ‘हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेची हीच वेळ आहे’, असे वाटत आहे.

४. गोवा येथील अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनात हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेचा प्रथम उद़्‍घोष !

वर्ष २०१२ मध्‍ये हिंदु जनजागृती समितीने गोवा येथे अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन आयोजित केले. त्‍याला भारत आणि शेजारी राष्‍ट्रांमधून अनेक हिंदुत्‍वनिष्‍ठ उपस्‍थित होते. त्‍यात प्रमुख मागणी ‘हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना’ ही होती. त्‍या काळात एकही राजकीय पक्ष ‘हिंदु राष्‍ट्र’ शब्‍द उच्‍चारत नव्‍हता. पुढे काळ सुकर होत गेला आणि आता प्रत्‍येकाच्‍या मुखातून ‘हिंदु राष्‍ट्र स्‍थापन व्‍हावे’, ही मागणी होत आहे. त्‍यामुळे सर्वधर्मसमभाववाल्‍यांना ‘भारतात हिंदु राष्‍ट्र आले, तर मुसलमानांचे काय ?’, याची चिंता वाटते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्‍वराज्‍याची स्‍थापना केली, तेव्‍हा त्‍यांच्‍या राज्‍यात मुसलमान नागरिकही रहात होते. हिंदु राष्‍ट्रामध्‍ये केवळ मनुष्‍याचाच नाही, तर पशूपक्षी, प्राणी, सूक्ष्मातील सूक्ष्मजीव यांच्‍याही कल्‍याणाचा विचार केला जाईल. त्‍यामुळे ‘आज तुम्‍हाला हिंदु राष्‍ट्र हवे कि मुसलमानांची जुलमी राजवट हवी ?’ एवढाच प्रश्‍न आहे.

५. धर्मांध, ख्रिस्‍ती, साम्‍यवादी, नक्षलवादी यांच्‍या मागण्‍या आणि हिंदु राष्‍ट्र !

धर्मांध ख्रिस्‍त्‍यांना संपूर्ण आशिया खंड ख्रिस्‍तीमय करायचा आहे. मुसलमानांना वर्ष २०४७ पर्यंत भारताला ‘इस्‍लामी राष्‍ट्र’ करायचे आहे. साम्‍यवाद्यांना नक्षलवादी आणि राष्‍ट्रविरोधी गट यांच्‍या साहाय्‍याने येथे ‘रेड कॉरिडॉर’ निर्माण करायचा आहे. अशा वेळी हिंदूंनी हिंदु राष्‍ट्राची मागणी केली, तर नवल काय ?

६. विविध संतांकडून होणारी हिंदु राष्‍ट्राची मागणी

हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेची मागणी केवळ सामान्‍य हिंदूच नाही, तर शंकराचार्य आणि अनेक धर्मप्रचारक संतही करत आहेत. बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्रीही हिंदु राष्‍ट्राचा उद़्‍घोष करतात. ते स्‍पष्‍टपणे म्‍हणाले, ‘जोपर्यंत हिंदूंना प्रत्‍येक मंदिरातून ‘सनातन हिंदु धर्म म्‍हणजे काय ? हे सांगितले जाणार नाही, तोपर्यंत धर्मांतरांच्‍या घटना घडत रहातील.’ ‘श्रीमद़्‍भागवता’च्‍या कथांचे वाचन करतांना त्‍यांनी श्रीमद़्‍भगवद़्‍गीतेतील श्रीकृष्‍ण-अर्जुन संवाद सांगितला, ‘ज्‍याप्रमाणे समुद्रात नाणे फेकल्‍यावर ‘ते परत मिळणार नाही’, असा विश्‍वास असतो, तसाच विश्‍वास धर्मांतर केलेल्‍या मनुष्‍यावरही ठेवावा.’ श्रीकृष्‍ण अर्जुनाला म्‍हणतो की, दुसर्‍या धर्माचा विचार करण्‍याहून स्‍वतःच्‍या धर्मात मरणे इष्‍ट (चांगले) आहे.’ प्रसिद्ध कथाकार जया किशोरी मध्‍यप्रदेशात रामकथा सांगतांना म्‍हणाल्‍या, ‘‘मी सनातनी असल्‍याने हिंदु राष्‍ट्र झाल्‍यास मला आनंद होईल.’’ यातून ‘भारत हा हिंदु राष्‍ट्र व्‍हावा’, ही प्रत्‍येक सनातनी हिंदूची इच्‍छा आहे.

७. धर्मांतराचे परिणाम !

स्‍वामी विवेकानंद म्‍हणत, ‘धर्मांतराने केवळ एक हिंदु न्‍यून होत नाही, तर एक हिंदुविरोधी वाढतो.’ ज्‍या ज्‍या राज्‍यांतून हिंदूंची लोकसंख्‍या घटली, तेथे तेथे राष्‍ट्रद्रोही प्रवृत्ती वाढल्‍या. त्‍यामुळे तेथे नेहमी प्रशासन आणि पोलीस यांना त्रास होईल, अशाच घटना घडतात. नेपाळ पूर्वी हिंदु राष्‍ट्र होते. साम्‍यवाद्यांनी त्‍याला ‘धर्मनिरपेक्ष राष्‍ट्र’ घोषित केले. त्‍यानंतर मुसलमानही म्‍हणाले की, आम्‍ही हिंदु राष्‍ट्रातच सुरक्षित होतो.

८. श्रीकृष्‍णाचे वचन !

समाजवादी पक्षाचे स्‍वामी प्रसाद मौर्य बुद्धपौर्णिमेच्‍या कार्यक्रमात म्‍हणाले, ‘‘हिंदु राष्‍ट्राची मागणी भारतविरोधी आहे’’; परंतु काही थोडे राजकारणी किंवा मुसलमानधार्जिणे नेते यांच्‍या मतांना काही किंमत नाही; कारण श्रीकृष्‍णाचे वचन आहे की,

यदा यदा हि धर्मस्‍य ग्‍लानिर्भवति भारत ।
अभ्‍युत्‍थानमधर्मस्‍य तदात्‍मानं सृजाम्‍यहम् ॥४.७॥

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्‍कृताम् ।
धर्मसंस्‍थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥४.८॥

– श्रीमद़्‍भगवद़्‍गीता

अर्थ : जेव्‍हा जेव्‍हा धर्माला ग्‍लानी येते (म्‍हणजे लोक धर्माचरण करत नाहीत) आणि अधर्म बळावू लागतो, तेव्‍हा मी स्‍वतः प्रकट होतो. सज्‍जनांच्‍या रक्षणासाठी, दुर्जनांच्‍या नाशासाठी आणि धर्मस्‍थापनेसाठी मी प्रत्‍येक युगात पुनःपुन्‍हा अवतार घेतो.

श्रीकृष्‍णाचे वचन लवकरच सिद्धीस जाईल अन् हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना वर्ष २०२५ मध्‍ये होणार, ही काळ्‍या दगडावरची रेघ !’

श्रीकृष्‍णार्पणमस्‍तु ।

– (पू.) अधिवक्‍ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्‍च न्‍यायालय (२६.५.२०२३)