१० कोटी रुपये मोजण्यापेक्षा मला १० रुपयांचा कंगवा द्या, मी माझे केस विंचरीन ! – उदयनिधी

  • शिरच्छेदासाठी १० कोटी रुपयांचे बक्षिस घोषित करणारे परमहंस आचार्य यांच्यावर उदयनिधी यांची उपरोधिक टीका !

  • उदयनिधी यांनी सनातन धर्म संपवण्याचे विधान केल्याचे प्रकरण

अयोध्येतील तपस्वी छावणीचे परमहंस आचार्य व उदयनिधी स्टॅलिन

चेन्नई (तमिळनाडू) – सनातन धर्म संपवण्याचे विधान केल्यावरून तमिळनाडूचे  मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांचा शिरच्छेद करणार्‍यास १० कोटी रुपयांचे बक्षिस देईन, अशी घोषणा अयोध्येतील तपस्वी छावणीचे परमहंस आचार्य यांनी केली होती. ‘उदयनिधी यांचा शिरच्छेद करण्यास कुणी पुढे आले नाही, तर मी स्वतः उदयनिधी यांना शोधून त्यांचा शिरच्छेद करीन’, असेही त्यांनी म्हटले होते. त्याला उदयनिधी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उदयनिधी म्हणाले, ‘आज एका स्वामींनी माझा शिरच्छेद करण्यासाठी १० कोटी रुपयांचे बक्षिस घोषित केले. ते खरे संत आहेत कि बनावट ? तुम्हाला माझे शिर का आवडते ? तुम्ही एवढे पैसे कुठून आणता ? माझ्या शिरासाठी १० कोटी रुपये कशाला मोजता ? त्यापेक्षा मला १० रुपयांचा कंगवा द्या, मी माझे केस स्वतः विंचरीन.’

विरोधकडून तमिळनाडू राज्याच्या आयुक्तांना निषेधाचे पत्र !

दुसरीकडे देहलीत भाजपच्या शिष्टमंडळाने तमिळनाडू सदनाला भेट देऊन तमिळनाडू राज्याच्या आयुक्तांकडे निषेधाचे पत्र दिले आणि ‘उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी केलेल्या वक्तव्यासाठी क्षमा माफी मागावी’, अशी मागणी केली.

तुमच्यात आणि कट्टरतावादी यांच्यात काय अंतर आहे ?

कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांची टीका !

बेंगळुरू (कर्नाटक) – भारतात प्रत्येकाला स्वतःचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे; मात्र तरीही लोकांच्या भावनांकडे पहाणे आवश्यक आहे. जर तुम्ही एखाद्याला ठार मारण्याची धमकी देत असला आणि १० कोटी रुपयांचे बक्षिस घोषित करत असाल, तर तुमच्यामध्ये आणि कट्टरतावाद्यांमध्ये काय अंतर आहे ? मी केवळ हेच सांगू इच्छितो की, त्यांना (परमहंस आचार्य) त्यांचा धर्म दया आणि समानता शिकवत नाही का ? (सनातन धर्म दया आणि समानता हेच शिकवतो, त्यामुळे त्याचे कुणी उल्लंघन करत असेल, त्याला विरोध केलाच पाहिजे; मात्र जे धर्म दया आणि समानता शिकवत नाहीत, त्यांच्या ग्रंथांमध्येच मूर्तीपूजकांना ठार मारण्यास सांगितले आहे, त्यांच्याविषयी खर्गे कधीही तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक)

संपादकीय भूमिका

कुणाचीही हत्या करण्यासाठी चिथावणे चुकीचे आहे. सनातन धर्म याला अनुमती देत नाही; मात्र प्रियांक खर्गे यांच्यासारखे लोक ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद करणे) अशा घोषणा देणार्‍या आणि तसे प्रत्यक्ष कृत्य करणार्‍या धर्मांधांच्या विरोधात कधीही तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !