कोटी कोटी प्रणाम !
आज ‘महर्षि भृगु अवतरणदिन’ आहे. त्या निमित्ताने….
१. महर्षि भृगु यांची माहिती
श्रीकृष्णाने भगवद्गीतेच्या १० व्या अध्यायात म्हटले आहे, ‘महर्षींमधील भृगु मी आहे.’ भृगु ऋषि आणि त्यांचे भृगुकुल हे श्रेष्ठ मानले गेले आहे. भृगु कुळामध्ये महर्षि च्यवन, महर्षि और्व, दैत्यगुरु शुक्राचार्य, प्रमति, महर्षि जमदग्नी, भगवान परशुराम इत्यादी महान तपस्वी होऊन गेले. भृगु कुळातील ऋषींना ‘भार्गव’ असे संबोधले जाते. मूळ भार्गव, म्हणजे महर्षि भृगु हे स्वयंभूव मन्वंतरातील मनूचे जावई होते. ते शंकराचे साडू आणि दक्षकन्या स्वाती हिचे पतीही होते.
ऋग्वेदात महर्षि भृगूंचा १८ वेळा आदरपूर्वक उल्लेख आढळतो. ते ‘सूक्तद्रष्टा’, वैदिक ऋषि असून त्यांची काही सूक्ते ऋग्वेदात आहेत. ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांपैकी भृगु हे एक होते. ‘भृगु आणि अंगीरस या दोघांची निर्मिती ब्रह्मदेवापासून एकाच वेळी झाली’, अशी कथा पुराणामध्ये आहे.
२. पाण्यापासून वीजनिर्मितीचा शोध लावणारे ‘प्राचीन वैज्ञानिक’ महर्षि भृगु !
आधुनिक काळात आज पाण्यापासून वीजनिर्मिती केली जाते, याचा शोध सहस्रो वर्षांपूर्वी भृगु ऋषींनी लावला होता. त्यामुळे त्यांना ‘प्राचीन वैज्ञानिक’ किंवा ‘संशोधक’ म्हणता येईल.
– स्वाती आलूरकर
(साभार : मासिक ‘मनशक्ती’, ऑगस्ट २००५)