१. शरिराचे कूळ किंवा गोत्र भले कोणतेही असो, तुमचे कूळ परमात्माच आहे !
२. सद़्गुरूंच्या हृदयात स्थान मिळवलेला जितका धनवान आहे, तितका धनवान जगातील कोणताही मनुष्य नाही. ज्याच्याकडे गुरुकृपारूपी धन आहे, तो सम्राटाहूनही जास्त सुखी आहे.
३. सत्संगाने ज्या उपलब्धी होतात, त्या जगाच्या कोणत्याही लौकिक कर्माने होत नाहीत.
४. एकाच वेळी दोन भाव सोबत राहू शकत नाही. दुःखाच्या वेळी जर दोन मिनिटेही भगवद़्भाव निर्माण झाला, तर वृत्ती भगवदाकार बनेल आणि कितीही मोठे दुःख असो, ते त्या वेळी रहाणार नाही.’
(संदर्भ : लोक कल्याण सेतू, मार्च २०२०)