हिंदु असल्याचा अभिमान असणारे रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार विवेक रामास्वामी यांच्यावर ‘राष्ट्रवादी’ ख्रिस्ती पाद्य्रांकडून टीका !
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमरिकेत पुढील वर्षी होणार्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्याऐवजी भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांच्या नावाची चर्चा आहे. काही लोकांनी यासाठी रामास्वामी यांना पाठिंबाही दिले आहे. रामास्वामी हिंदु असल्याने अनेक ख्रिस्ती पाद्य्रांनी त्यांना विरोध केला आहे. अशातच ट्रम्प समर्थक पाद्री हँक कुन्नेमन यांनी म्हटले की, जर रामास्वामी निवडून आले, तर आपल्याला व्हाईट हाऊसमध्ये विचित्र प्रकारच्या हिंदु देवतांच्या प्रतिमा पहायला मिळतील.
विवेक रामास्वामी भारतीय मूल के अमेरिकी हैं जो अमेरिकी राष्ट्रपति चुनावों में रिपब्लिकन उम्मीदवार है. #VivekRamaswami #DonaldTrump https://t.co/KulwLumeMy
— AajTak (@aajtak) August 25, 2023
१. ‘द रोलिंग स्टोन’ या मासिकात प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार कुन्नेमन यांनी रामास्वामी यांच्या विरोधात ते हिंदु असल्यावरून पुष्कळ वक्तव्ये केली आहेत. कुन्नेमन म्हणाले, ‘‘रामास्वामी यांच्या रूपातील ‘नव्या युवा शक्ती’चा आपल्याला धोका आहे. जर ती व्यक्ती प्रभु येशू यांची सेवा करत नाही, तर तुमचा ईश्वर तुमच्यावर अप्रसन्न होईल. आपण काय करत आहोत ? आपण कुठल्या व्यक्तीला बायबलच्या ऐवजी अन्य कोणत्या धर्मग्रंथावर हात ठेवू द्याल का ?’’
२. ओक्लाहोमाचे पादरी जॉन बेनेट यांनी रामास्वामी यांच्याविषयी धादांत खोटे वक्तव्य करत म्हटले की, खिस्त्यांची मते मिळवण्यासाठी रामास्वामी यांनी ख्रिस्ती असल्याचा दावा केला. खरेतर रामास्वामी यांनी अशा प्रकारे कधीच दावा केलेला नाही.
३. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये प्रकाशित एका लेखानुसार रामास्वामी यांच्या नंतर असलेले दुसर्या क्रमांकाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डी. सँटिस हे रामास्वामी यांना त्यांचा धर्म आणि पार्श्वभूमी यांवरून लक्ष्य करू शकतात. याद्वारे ते ख्रिस्ती रुढीवादी लोकांची मते मिळवू शकतील.
संपादकीय भूमिकाहिंदूंचा द्वेष करणारी अमेरिका ! तसे पाहिले, तर अमेरिकी हिंदू रिपब्लिकन पक्षाचे पारंपरिक मतदार मानले जातात. त्यामुळे जर कुणी हिंदु व्यक्तीच राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार बनत असेल, तर राष्ट्रवादी म्हणून समजल्या जाणार्या ख्रिस्ती पाद्य्रांच्या पोटात का दुखते ? यातून या पक्षाचे ढोंगी हिंदु प्रेम लक्षात येते ! |
माझ्यासाठी हिंदु धर्म हा अडथळा नाही, तर एक अद्वितीय लाभ ! – विवेक रामास्वामी१. रामास्वामी यांचे आई-वडील भारतातून अमेरिकेत स्थायिक झाले. रामास्वामी यांनीही स्वत:ची हिंदु श्रद्धा टिकवून ठेवली. २. ते म्हणतात की, माझ्यासाठी हिंदु धर्म हा अडथळा नाही, तर एक अद्वितीय लाभ आहे. मी धर्माच्या पुनरुद्धारासाठी कोणत्याही भीतीविना नेहमीच उभा असीन. ३. त्यांनी काहीच दिवसांपूर्वी अमेरिकेने भारताशी सहकार्य वाढवण्याच्या भूमिकेचा विस्तार करण्याचे समर्थन केले होते. ते म्हणाले की, भारत आणि अमेरिका यांच्यात अविश्वासाचे संबंध आहेत; कारण अमेरिकेने दोन्ही देशांमध्ये विश्वासावर आधारित संवाद साधलेला नाही. जर मी माझ्या कार्यकाळात दोन्ही देशांत विश्वास संपादन करू शकलो नाही, तर मी स्वत:ला अपयशी समजीन. ४. रामास्वामी यांचे म्हणणे राहिले आहे की, समाजात विभाजनाचा विचार हा हिंदु, ख्रिस्ती अथवा ज्यू धर्मांतील लोकांमध्ये नाही, तर जे लोक ‘खर्या ईश्वरा’वर विश्वास ठेवतात आणि जे ‘वोकिज्म’च्या (कथित उदार पुरोगामी विचारसरणीच्या) नावाखाली धर्माला जलवायुवाद आणि समलैंगिकता यांना नव्या विचारसरणींच्या रूपात पालटण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यामुळे विभाजन होत आहे. संपादकीय भूमिकाहिंदु धर्माविषयी नसानसांत द्वेष भिनलेला काँग्रेस पक्ष कुठे आणि विवेक रामास्वामी यांच्यासारखे हिंदु धर्मप्रेमी कुठे ? |