नवी मुंबई – तुर्भे गावातील अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांवर पुष्कळ प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना पाठीच्या मणक्याचे आजार होऊ लागले आहेत.
तुर्भे गाव ३ नगरसेवकांमध्ये विभागले असूनही या ठिकाणचे रस्ते खड्डेमुक्त होत नाहीत. खड्ड्यांमुळे किरकोळ अपघातही होत आहेत. त्यामुळे ‘वरिष्ठ अधिकार्यांनी यात लक्ष घालून येथील रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावेत’, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (अशी मागणी करण्याची वेळच का येते ? प्रशासन स्वतःहून दुरुस्ती लवकर का करत नाही? – संपादक)
संपादकीय भूमिका :नागरिकांच्या जिवावर बेतूनही खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्न न करणार्यांना कठोर शिक्षा करा ! |