समृद्धी महामार्गावरील वाढत्‍या अपघातांमुळे वाहतूक थांबवण्‍यासाठी नागपूर खंडपिठात याचिका प्रविष्‍ट

प्रतिकात्मक चित्र

नागपूर – समृद्धी महामार्गावर सातत्‍याने होणार्‍या अपघातांच्‍या पार्श्‍वभूमीवर  ‘तेथील वाहतूक तूर्त थांबवावी’, अशी याचिका नागपूर खंडपिठात याचिका २३ ऑगस्‍ट या दिवशी प्रविष्‍ट करण्‍यात आली आहे. या याचिकेची नोंद घेत न्‍यायालयाने राज्‍य सरकार आणि ‘एम्.एस्.आर्.डी.सी.’ला नोटीस बजावत ४ आठवड्यांत उत्तर देण्‍यास सांगितले आहे.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर वाहतुकीला अनुमती देण्‍यापूर्वी सुरक्षाविषयक उपाययोजना करण्‍यात याव्‍यात, तसेच सुरक्षिततेच्‍या समस्‍यांचे निराकरण होईपर्यंत महामार्गावरून वाहतूक तात्‍पुरती थांबवण्‍यात यावी, असे या याचिकेत म्‍हटले आहे. तज्ञ ‘पॅनल’ची स्‍थापना, चिन्‍हे, वाहन पडताळणी, प्रथमोपचार रुग्‍णालयाच्‍या स्‍थापनेसह विविध उपाय याचिकेत सुचवले. न्‍यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्‍यायमूर्ती वृषाली जोशी यांनी राज्‍य सरकार आणि ‘एम्.एस्.आर्.डी.सी.’ला नोटीस बजावत ४ आठवड्यांत उत्तर देण्‍यास सांगितले आहे.