आयझॉल (मिझोराम) – मिझोरामधील सैरांग येथे बांधकाम चालू असलेला एक रेल्वे पूल कोसळून १७ कामगारांचा मृत्यू झाला. सकाळी १० वाजता ही घटना घडली.
घटनेच्या वेळी पुलावर ३५ ते ४० कामगार काम करत होते. तेव्हा हा अपघात घडला.
मिजोरम की नदी पर बन रहा रेलवे का पुल गिरा, 17 की मौत: मौके पर काम कर रहे थे 40 मजदूर, PM मोदी ने किया मुआवजे का ऐलान#Mizoram #MizoramBridgeCollapsehttps://t.co/fGoE68yZl4
— ऑपइंडिया (@OpIndia_in) August 23, 2023
बैराबी ते सायरंग जोडणार्या कुरुंग नदीवर हा पूल बांधला जात होता. तिसर्या आणि चौथ्या खांबांमधील ‘गर्डर’ (दोन खांबांना जोडणारा भाग) ३४१ फूट खाली कोसळला. सर्व मजूर याच गर्डरवर काम करत होते. भूमीपासून पुलाची उंची ३४१ फूट आहे. म्हणजे हा पूल कुतूबमिनारपेक्षाही उंच आहे.