काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यपाल कुरेशी यांचा थयथयाट !
भोपाळ – मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यपाल अझीझ कुरेशी यांनी वादग्रस्त विधाने केली आहेत. काँग्रेस नेते कमलनाथ आणि काँग्रेस पक्ष यांनी हिंदुत्वाच्या दिशेने टाकलेल्या पावलांमुळे काँग्रेसचे नेते माजी राज्यपाल अझीझ कुरेशी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस हिंदुत्वाकडे झुकत चालल्यावरून त्यांनी टीका केली आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने विदिशा येथे आयोजित अल्पसंख्यांक अधिवेशनात त्यांनी केलेले भाषण सामाजिक माध्यमांत प्रसारित झाले आहे. ते म्हणाले, ‘‘नेहरूचे वारसदार असणारे काँग्रेसची लोक आज धार्मिक यात्रा काढत आहेत. ‘गर्व से कहो हम हिन्दू हैं’ असे म्हणतात. काँग्रेस कार्यालयात देवतांच्या मूर्ती स्थापन करतात. जय गंगामाता, जय नर्मदा माता, अशी घोषणा देतात, हे लज्जास्पद आहे.’
पूर्व राज्यपाल अजीज कुरैशी ने कांग्रेस पर बोला हमला..
हिन्दुत्व की माला जपने वाले नेताओं पर साधा निशाना, कांग्रेस नेताओं को चुल्लू भर पानी में डूबने की दी सलाह#AzizQureshi #Congress #Hindutav #Muslim pic.twitter.com/sPEKLSfd0G
— India TV (@indiatvnews) August 22, 2023
(म्हणे) ‘मुसलमानांनी हातात बांगड्या भरलेल्या नाहीत !’
अझीझ कुरेशी म्हणाले, ‘‘तुम्ही आमची घरे-दुकाने जाळता, तुम्ही आमच्या माता-भगिनींचा अपमान करता. (याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! धर्मांध मुसलमान हिंदूंची घरे जाळतात, हिंदूंच्या तरुणींना लव्ह जिहादद्वारे फसवतात, त्यांचे धर्मांतर करतात, ही वस्तूस्थिती आहे. – संपादक) आम्ही एका ठरावीक मर्यादेपर्यंत सहन करू; मात्र जेव्हा पाणी डोक्यावरून जाईल, तेव्हा मुसलमान हातामध्ये बांगड्या भरून रहाणार नाहीत. २२ कोटी मुसलमानांतील २ कोटी मुसलमान ठार झाले, तरी काही अडचण नाही.’’
संपादकीय भूमिकाहिंदु अशा धमक्यांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी सिद्ध आहेत का ? |
मुसलमान तुमचे गुलाम नाहीत !
अझीझ पुढे म्हणाले की, काँग्रेससह देशातील सर्व राजकीय पक्षांना आम्ही सांगू इच्छितो की, मुसलमान तुमचे गुलाम नाहीत. तुम्ही त्यांना नोकर्या देत नाही, त्यांना पोलीस, सैन्य यामध्ये घेत नाही; मग मुसलमानांनी तुम्हाला मतदान का करावे ? (मतदान करायचे नसेल, तर नागरिक म्हणून या देशात रहाता तरी कशाला, पाकिस्तानात चालते व्हा, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|