कराड (जिल्‍हा सातारा) येथील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे (कै.) मिलिंद वडणगेकर यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये !

(कै.) मिलिंद वडणगेकर

१. सौ. रत्नप्रभा घोरपडे, कराड, जिल्‍हा सातारा.

१ अ. प्रेमभाव : ‘वडणगेकरकाकांकडे निधीसंकलनाची आणि ‘सनातन प्रभात’च्‍या विशेषांकांच्‍या संदर्भातील सेवा होती; परंतु या सेवा करतांना काका कधीही चिडले किंवा रागावले नाहीत. साधकांनी वैयक्‍तिक अडचणी सांगितल्‍या, तरी ‘वडील’ या नात्‍याने ते साधकांना समजावून सांगायचे.’

२. सौ. शुभांगी पाटील, कराड, जिल्‍हा सातारा.

अ. ‘काका नेहमी शांतपणे बोलायचे.

आ. काकांना सेवेतील अडचण सांगितल्‍यावर ते तत्‍परतेने त्‍यावरील उपाययोजना काढत असत.

इ. काका साधकांना सेवेत साहाय्‍य करायचे. साधकांना त्‍यांचा पुष्‍कळ आधार वाटायचा.’

३. सौ. रुक्‍मिणी अशोक माने आणि सौ. नीला देसाई, कराड, जिल्‍हा सातारा.

अ. ‘नवरात्रीमध्‍ये ग्रंथप्रदर्शनाच्‍या ठिकाणी उशीर झाला, तर काका साधकांना घरी नेऊन सोडायचे.

आ. सेवेसाठी जिल्‍ह्यात जायचे असल्‍यास काका ‘गाडी ठरवणे, नियोजन करणे आणि समन्‍वय करणे’ इत्‍यादी सेवा करायचे.

इ. काकांकडे सात्त्विक उत्‍पादनांची (अत्तर, कापूर, उदबत्ती यांची) मागणी केली की, ते ती उत्‍पादने वेळेत आणून द्यायचे.’

(सर्व सूत्रांचा मास आणि वर्ष : जुलै २०२३)