स्‍टीलचा वापर टाळून पितळ, तांबे यांपासून बनलेल्‍या भांड्यांचा वापर करणे श्रेयस्‍कर ! – महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाचे संशोधन

‘साधारण ५०-६० वर्षांपूर्वी घरोघरी पितळ, तांबे यांपासून बनलेल्‍या भांड्यांचा वापर केला जात असे. काळाच्‍या ओघात त्‍यांची जागा स्‍टील, अल्‍युमिनियम यांसारख्‍या धातूंपासून बनणार्‍या आकर्षक भांड्यांनी घेतली. भांडी वापरण्‍यास सोयीची अन् आकर्षक असण्‍यासह ती सात्त्विक असणेही आवश्‍यक आहे, याचा सर्वांना विसर पडला.

‘विविध धातूंच्‍या पेल्‍यांत पाणी ठेवल्‍यावर पाण्‍यावर काय परिणाम होतो ?’, हे अभ्‍यासण्‍यासाठी महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाने ‘युनिव्‍हर्सल ऑरा स्‍कॅनर’ (यू.ए.एस्.) या उपकरणाद्वारे एक चाचणी केली. यातील निरीक्षणांचा तुलनात्‍मक अभ्‍यास केल्‍यावर लक्षात आले की, असात्त्विक धातूंच्‍या भांड्यातील पाणी अल्‍पावधीत अतिशय दूषित होते; याउलट सात्त्विक धातूंच्‍या भांड्यातील पाणी अल्‍पावधीत शुद्ध होते.

१. विविध धातूंच्‍या पेल्‍यांची निरीक्षणे

विविध धातूंच्‍या पेल्‍यांत पाणी ठेवण्‍यापूर्वी त्‍या पेल्‍यांच्‍या चाचण्‍या करण्‍यात आल्‍या. त्‍यांची निरीक्षणे पुढे दिली आहेत.

सौ. मधुरा कर्वे

२. विविध धातूंच्‍या पेल्‍यांतील पाण्‍याची निरीक्षणे

या प्रयोगासाठी एका घरातील नळाचे पाणी प्‍लास्‍टिकच्‍या बाटलीत भरून आणले होते. हे पाणी पेल्‍यात ठेवण्‍यापूर्वी त्‍या पाण्‍याची चाचणी करण्‍यात आली. हे पाणी विविध धातूंच्‍या पेल्‍यांत ठेवून त्‍याच्‍या (पाण्‍याच्‍या) पुढील टप्‍प्‍यांत चाचण्‍या करण्‍यात आल्‍या.

अ. पेल्‍यात पाणी ठेवल्‍यावर लगेच

आ. पेल्‍यात पाणी ठेवल्‍यावर १० मिनिटांनी

इ. पेल्‍यात पाणी ठेवल्‍यावर २० मिनिटांनी

या चाचण्‍यांतील निरीक्षणे पुढे दिली आहेत.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

३. चाचणीचे निष्‍कर्ष

अ. स्‍टीलच्‍या पेल्‍यात पाणी ठेवल्‍यावर पाण्‍यातील नकारात्‍मक ऊर्जा उत्तरोत्तर पुष्‍कळ वाढली. यातून ‘स्‍टीलच्‍या भांड्यात पाणी ठेवल्‍याने ते दूषित होते’, असे लक्षात येते.

आ. पितळ, तांबे, चांदी आणि कांस्‍य हे धातू उत्तरोत्तर अधिक सात्त्विक आहेत. या धातूंच्‍या पेल्‍यात १० ते २० मिनिटे पाणी ठेवल्‍यावर पाण्‍यातील नकारात्‍मक ऊर्जा नाहीशी होऊन त्‍यामध्‍ये पुष्‍कळ सकारात्‍मक ऊर्जा निर्माण झाली. यातून ‘या धातूंच्‍या भांड्यात पाणी ठेवल्‍यावर ते अल्‍पावधीत शुद्ध होते’, असे लक्षात येते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा. (१८.७.२०२३)

ई-मेल : [email protected]

वाचकांना आवाहन – स्‍टीलचा वापर टाळून पितळ, तांबे यांपासून बनलेल्‍या भांड्यांचा वापर करा !

‘आपण दैनंदिन जीवनात प्रतिदिन स्‍टीलच्‍या भांड्यांचा उपयोग करत असतो, उदा. पाणी साठवणे, स्‍वयंपाक करणे, भोजन करणे इत्‍यादी. केवळ १० ते २० मिनिटे स्‍टीलच्‍या पेल्‍यांत ठेवलेल्‍या पाण्‍यावर इतका प्रचंड नकारात्‍मक परिणाम होतो, तर स्‍टीलच्‍या भांड्यात बनवलेला स्‍वयंपाक, तसेच स्‍टीलच्‍या ताट-वाटीत वाढलेले अन्‍न ग्रहण केल्‍यावर आपल्‍या कुटुंबियांवर किती नकारात्‍मक परिणाम होत असेल, याची कल्‍पनाच करवत नाही. एकूणच या संशोधनातून स्‍टीलची भांडी वापरणे हितावह नाही, हे लक्षात येते. आपले शारीरिक, मानसिक अन् आध्‍यात्मिक आरोग्‍य चांगले रहावे यांसाठी स्‍टीलचा वापर टाळून पितळ, तांबे यांपासून बनलेल्‍या भांड्यांचा वापर करणे श्रेयस्‍कर !’

– सौ. मधुरा कर्वे