बुलढाणा – जिल्ह्यातील मलकापूर येथील औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयातील मुजम्मिल खान अहमद खान या विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवरून पाकिस्तानदिनाच्या शुभेच्छा दिल्याप्रकरणी या तरुणाला पोलिसांनी १५ ऑगस्ट या दिवशी अटक केली आहे. पुणे येथे ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या.
अटक केलेल्या तरुणाने इंस्टाग्रामवर पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाचा उल्लेख करत ‘पाकिस्तानी झेंडे आणि पाकिस्तानी असल्याचा गर्व आहे’, अशी पोस्ट टाकली होती. १४ ऑगस्ट या दिवशी पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन होता. इंस्टाग्रामवर त्याची ही पोस्ट प्रसारित झाली. महाविद्यालयातील काही जणांनी याविषयी त्याला समजावले; पण त्याने त्यांनाच धमकावून ‘मी ही पोस्ट काढणार नाही’, असे म्हटले.
यानंतर महाविद्यालयातील त्याच्या सहकार्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी मुजम्मिल खान अहमद खान विरोधात गुन्हा नोंदवला. त्याला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर मोठा जमाव गोळा झाला होता; मात्र पोलिसांनी गुन्हा नोंद केल्याने तणाव निवळला.
संपादकीय भूमिकापाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे धाडस दाखवणारे भारतात रहाणे देशासाठी घातक ! भारतात राहून शत्रूराष्ट्र पाकिस्तानदिनाच्या शुभेच्छा देणार्या विद्यार्थ्याला पाकिस्तानातच पाठवले पाहिजे. या देशात जे ‘वन्दे मातरम्’ न म्हणता ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देतील, अशा देशद्रोह्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे ! |