पनवेल – रस्ते आस्थापनाच्या अध्यक्षांसह अनेक लोक आहेत; पण पक्ष म्हणून तुम्हाला यात उतरावे लागेल. पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत सर्वांनाच उतरावे लागेल. आवश्यकतेनुसार एकमेकांना सहकार्य करावे लागेल. आपल्याला लोकांना त्रास द्यायचा नाही, हे लक्षात ठेवा; पण आंदोलन अशा प्रकारचे झाले पाहिजे की, सरकारकडून तात्काळ पावले उचलली गेली पाहिजेत. लोकांना चांगला आणि उत्तम रस्ता मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. गेल्या १२-१३ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी येथे वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते.
राज ठाकरे यांनी पनवेल या ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांबद्दल चिंता व्यक्त केली होती. अशातच, ज्या कंपनीने मुंबई-गोवा महामार्गाचे काम केले होते, त्या कंपनीच्या कार्यालयाची कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. pic.twitter.com/WSuZhwenJj
— SakalMedia (@SakalMediaNews) August 16, 2023
ते पुढे म्हणाले, ‘‘कोकणात उद्योग आलेच पाहिजेत; पण कोकणचे सौंदर्य राखले गेले पाहिजेत. असा प्रदेश सहसा मिळत नाही. महाराष्ट्राला परमेश्वराची कृपा मिळाली आहे. ती जपावी. मी तुमच्यासोबत आहेच, जेथे माझी गरज लागेल, तेथे तुम्ही मला हक्काने बोलवा.’’
VIDEO | पनवेलमध्ये झालेल्या निर्धार मेळाव्यातील राज ठाकरे यांच्या ‘त्या’ भाषणानंतर मनसे आक्रमक, मुंबई- गोवा महामार्गाचं काम करणाऱ्या कंपनीची मनसैनिकांकडून तोडफोडhttps://t.co/lCKAObixzl#mns #rajthackeray #MumbaiGoaHighway #chetaksunny
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 16, 2023
माणगाव येथे कंत्राटदाराचे कार्यालय मनसेने फोडले !
राज ठाकरे यांच्या भाषणानंतर माणगाव येथे महामार्ग सिद्ध करणार्या पहिल्या कंत्राटदाराचे कार्यालय मनसे सैनिकांनी फोडले. |