मुंबईत मुसलमान विद्यार्थ्‍याने पाकिस्‍तानच्‍या स्‍वातंत्र्यदिनाचा ‘स्‍टेटस’ ठेवला !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – कुलाबा येथील १९ वर्षीय २ महाविद्यालयीन मुसलमान विद्यार्थ्‍यांनी ‘इंस्‍टाग्राम’वर (सामाजिक प्रसारमाध्‍यमांवर) पाकिस्‍तानच्‍या स्‍वातंत्र्यदिनाचा व्‍हिडिओ ‘स्‍टेटस’ (सामाजिक प्रसारमाध्‍यमांवर स्‍वत:च्‍या खात्‍याची ओळख दाखवणारे ठेवलेले चित्र आणि व्‍हिडिओ) म्‍हणून ठेवला. एका व्‍यापार्‍याने केलेल्‍या तक्रारीवरून आतंकवादविरोधी पथकाने (एटीएस्) १४ ऑगस्‍टच्‍या रात्री दोन्‍ही युवकांना कह्यात घेतले. समज देऊन त्‍यांना सोडण्‍यात आले. (शत्रूराष्‍ट्राविषयी आत्‍मीयता बाळगणार्‍यांची पाळेमुळे शोधून काढणे आवश्‍यक आहे. – संपादक)

दोन्‍ही युवकांच्‍या भ्रमणभाषमध्‍ये पाकिस्‍तानच्‍या स्‍वातंत्र्यदिनाची छायाचित्रेही आढळली. याविषयी एका पोलीस अधिकार्‍यांनी ‘त्‍या युवकांच्‍या बोलण्‍याच्‍या आणि वागण्‍याच्‍या पद्धतीवरून १५ ऑगस्‍टला कायदा आणि सुव्‍यवस्‍था बिघडवण्‍याच्‍या उद्देशाने हे करण्‍यात आले असावे’, असे म्‍हटले.

संपादकीय भूमिका :

  • पाकिस्‍तानचा स्‍वातंत्र्यदिन साजरा करण्‍याचे धाडस दाखवणारे भारतात रहाणे देशासाठी घातक !
  • देशातील विविध ठिकाणी अटक करण्‍यात आलेल्‍या आतंकवाद्यांच्‍या पार्श्‍वभूमीवर या घटनांच्‍या विरोधातही त्‍वरित कठोर कारवाई होणे आवश्‍यक आहे !