स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या संचलनात शस्त्रास्त्रांसह कुकी आतंकवादी सहभागी !

चुराचांदपूर (मणीपूर) येथील घटना

नवी देहली – मणीपूर येथील चुराचांदपूर येथे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या संचलनामध्ये शस्त्रास्त्रसंपन्न कुकी आतंकवादी सहभागी झाल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. हा व्हिडिओ ट्विटरद्वारे प्रसारित करून माजी सैन्याधिकारी लेफ्टनंट जनरल निशीकांता सिंह यांनी म्हटले की, केवळ संरक्षणयंत्रणांनाच संचलनाच्या वेळी शस्त्रास्त्रे दाखवण्याचा अधिकार आहे. अशा प्रकारे कुकी आतंकवाद्यांचे हे कृत्य ‘त्यांना आडकाठी करणारे कुणी नाही’, असाच संदेश देते. मैतेई समाजाला सरकारवर विश्‍वास ठेवण्यासह त्यांनी स्वत:ही युद्ध करण्यासाठी सज्ज असलेले बरे !

चुराचांदपूर हे गाव ख्रिस्ती कुकी आणि हिंदु मैतेई या समाजांच्या संघर्षामुळे पेटले आहे. येथील मैतेई समाजाच्या लोकांना पळवून लावून कुकी आतंकवाद्यांनी त्यांच्या अनेक घरांना आग लावल्याचे काही आठवड्यांपूर्वी समोर आले होते.

संपादकीय भूमिका

अशा कुकी आतंकवाद्यांवर आता सरकारने कठोर कारवाई करायला हवी !