कायदे कडक असतील, तरच परंपरा जपली जाईल ! – अधिवक्‍ता (श्री.) अश्‍विनीकुमार उपाध्‍याय, सर्वोच्‍च न्‍यायालय

अधिवक्‍ता (श्री.) अश्‍विनीकुमार उपाध्‍याय, सर्वोच्‍च न्‍यायालय

पुणे – इंग्रजांनी बनवलेले कायदे हे त्‍यांना हितकारक होते. त्‍यामुळे त्‍या कायद्यांमध्‍ये पालट करणे आवश्‍यक आहे. कायदे कडक नसतील, तर अराजकता माजल्‍याविना रहाणार नाही. कायदे कडक असतील, तरच ही परंपरा जपली आणि वाढवली जाईल. त्‍यासाठी लोकप्रतिनिधींनी योग्‍य कायदे बनवायला हवेत, असे मत सर्वोच्‍च न्‍यालयातील वरिष्‍ठ अधिवक्‍ता (श्री.) अश्‍विनी कुमार उपाध्‍याय यांनी व्‍यक्‍त केले. ते ‘अन्‍वर द पुणे आवर’ उपक्रमांतर्गत ‘भारतीय मानवाधिकार परिषद’ आणि ‘श्री नवलमल फिरोदिया लॉ महाविद्यालय’ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ‘युनिफॉर्म सिव्‍हिल कोड’ (यूसीसी) या विषयावर बोलत होते.

अधिवक्‍ता (श्री.) उपाध्‍याय म्‍हणाले, ‘‘कायद्याचे उल्लंघन केले; म्‍हणून कुणाचे नागरिकत्‍व रहित झाले, हे ऐकिवात नाही. ज्‍यांना समानता मान्‍य नाही, त्‍यांच्‍यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. कडक कायदे केल्‍याने सिंगापूर आणि दुबई येथे प्रगती झाली.’’