केरळच्या मलप्पुरम येथे पी.एफ्.आय.च्या जिहादी कार्यकर्त्यांच्या घरांवर छापेमारी !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने केली कारवाई !

नवी देहली – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) बंदी घालण्यात आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पी.एफ्.आय.च्या) जिहादी कार्यकर्त्यांच्या घरांवर छापे टाकले. केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील रिरूर येथे ही छापेमारी १३ ऑगस्टच्या सकाळपासून चालू करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी मलप्पुरम येथील ‘पी.एफ्.आय.’च्या मुख्यालयावरही छापा टाकण्यात आला होता.

केंद्रशासनाने सप्टेंबर २०२२ मध्ये या संघटनेवर बंदी लादली होती. या संघटनेच्या देशभरातील अनेक कार्यालयांवर आणि कार्यकर्त्यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले असून अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांवर हत्येचे गुन्हे नोंद आहेत.

संपादकीय भूमिका

बंदी घालण्यात आलेल्या पी.एफ्.आय.च्या जिहादी कार्यकर्त्यांच्या कारवाया अजूनही चालू आहेत. त्यामुळे पी.एफ्.आय.वर नुसती बंदी घालणे पुरेशी नसून तिची पाळे-मुळे खणून काढणे आवश्यक आहेत !