सरकारच्या धोरणांमुळे ९ वर्षांत देशाचा आर्थिक विकास झाला ! – अर्थमंत्री निर्मला सीतारामन्

नवी देहली – आपल्या सरकारच्या धोरणांमुळे ९ वर्षांत भारताची अर्थव्यवस्था सुधारली आणि आर्थिक विकास झाला. आज आपण जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहोत, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अविश्‍वास प्रस्तावावरील चर्चेच्या वेळी सांगितले. निर्मला सीतारामन् यांनी मोदी सरकारच्या कामगिरीची सूचीच लोकसभेत सादर केली.

त्या म्हणाल्या की,

१.‘बँकिंग क्षेत्र सुधारण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. बँका आता राजकीय हस्तक्षेपाविना काम करत आहेत.

२. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या वेळी बँकांची स्थिती अत्यंत वाईट होती.  आज देशातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका नफ्यात आहेत.

३. अर्थमंत्री म्हणाल्या की ‘होणार’, ‘मिळणार’ हे शब्द आता प्रचलित नाहीत. आजकाल लोक ‘झाले’, ‘मिळाले’, असा शब्दप्रयोग करत आहेत.