६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची फोंडा, गोवा येथील कु. श्रिया राजंदेकर (वय १२ वर्षे) हिला रामनाथी आश्रमातील प्रसाद भांडारात सेवा करतांना प्रसाद भांडार आणि सौ. वर्धिनी गोरल (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के) यांच्‍याविषयी लक्षात आलेली काही वैशिष्‍ट्यपूर्ण सूत्रे !

१. प्रसाद भांडाराविषयी जाणवलेली वैशिष्‍ट्यपूर्ण सूत्रे

कु. श्रिया राजंदेकर

१ अ. थंडावा आणि चैतन्‍य जाणवणे : रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमातील ‘प्रसाद भांडारात सेवा करण्‍यासाठी गेल्‍यावर मला वेगळाच थंडावा आणि चैतन्‍य जाणवते. तिथे एकच पंखा लावला, तरीही थंडावा जाणवतो आणि त्‍या वार्‍याच्‍या लहरींमध्‍ये चैतन्‍य जाणवते.

१ आ. शारीरिक थकवा न जाणवणे : प्रसाद भांडारात सेवा करतांना मला शारीरिक थकवा जाणवत नाही. ‘मी तिथे किती वेळ सेवा केली ?’, हेच मला कळत नाही. केवळ ‘सेवा करतच रहावी’, असे मला वाटते.

१ इ. मन निर्विचार होणे : तिथे सेवा करतांना मला वेगळीच शांती अनुभवता येऊन माझे मन निर्विचार होते.

१ ई. वेगळा सुगंध येऊन मोकळेपणानेे श्‍वास घेता येणे : प्रसाद भांडारात वेगळाच दैवी सुगंध येतो. ‘तो सुगंध कोणता ?’, हे माझ्‍या लक्षात येत नाही; पण त्‍या सुगंधामुळे तिथे मोकळेपणाने श्‍वास घेता येतो. घरी अथवा अन्‍य ठिकाणी तसा मोकळा श्‍वास घेता येत नाही.

१ उ. पुष्‍कळ हलकेपणा जाणवणे : मला तिथे पुष्‍कळ हलकेपणा जाणवून शरिराचे वजन जाणवत नाही. ‘मी एका ढगावरच उभी आहे’, असे मला वाटते. मला तिथे स्‍वतःचे अस्‍तित्‍वही जाणवत नसल्‍यामुळे ‘मी तिथे नाही’, असे वाटते.

१ ऊ. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्‍तित्‍व सतत जाणवणे : प्रसाद भांडारात सेवा करतांना मला प.पू. गुरुदेवांचे (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे) अस्‍तित्‍व क्षणोक्षणी अनुभवता येते. ‘गुरुदेव प्रत्‍यक्ष तिथे उपस्‍थित आहेत’, असे मला जाणवते.

२. सौ. वर्धिनी गोरल (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के) यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये !

सौ. वर्धिनी गोरल

२ अ. आनंदी : सौ. वर्धिनीताई नेहमी आनंदी असते. तिच्‍या चेहर्‍यावर कधीही ताण अथवा दुःख नसते. तिच्‍याकडे पाहूनही मला आनंद मिळतो.

२ आ. इतरांना समजून घेणे आणि नम्रता : वर्धिनीताई मला प्रसाद भांडारातील सेवा सांगतांना ‘मला समजेल’, अशा प्रकारे आणि मला समजेपर्यंत सांगते. मला सेवेमध्‍ये कुठली शंका असेल किंवा काही समजत नसेल, तर ती मला ते नीट समजावून सांगते. ती सेवा सांगतांनाही प्रेमाने आणि आपुलकीने सांगते. तिच्‍या बोलण्‍यामध्‍ये नेहमीच नम्रता असते.

२ इ. परिस्‍थिती स्‍वीकारणे : वर्धिनीताईला ऐनवेळी कुठली सेवा आली आणि तिला अजून पुष्‍कळ सेवा करायच्‍या असल्‍या, तरी ती त्‍या प्रसंगांमध्‍ये स्‍थिर असते. ती गडबडून जात नाही. ती सर्व परिस्‍थिती स्‍थिर राहून हाताळते.

२ ई. झोकून देऊन सेवा करणे : कधी तिला बरे वाटत नसेल आणि बर्‍याच सेवा असल्‍या, तर ती गुरुदेवांवर (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍यावर) श्रद्धा ठेवून आणि झोकून देऊन सेवा करते. तिची गुरुदेवांवर अपार श्रद्धा आहे.

२ उ. गुरुदेवांप्रती भाव : सेवा करतांना वर्धिनीताई तिला गुरुदेवांविषयी आलेल्‍या अनुभूती मला सांगते. तेव्‍हा तिच्‍यामधील प.पू. गुरुदेवांप्रती असलेला अपार भाव आणि श्रद्धा मला अनुभवता येते.

‘हे प.पू. गुरुदेव, आपण मला प्रसाद भांडारातील सेवा सौ. वर्धिनीताईकडून शिकण्‍याची संधी देत आहात. या संधीचा मला लाभ करून घेता येऊ दे. आज आपल्‍याच अनंत कृपेने मला ही सूत्रे लिहिता आली’, याबद्दल मी आपल्‍या श्री चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करते.’

– कु. श्रिया राजंदेकर (आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के, वय वर्षे १२), फोंडा, गोवा. (२७.४.२०२३)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक