हरियाणाच्या गृहमंत्र्यांचे वक्तव्य
चंडीगड (हरियाणा) – हरियाणातील नूंहमध्ये ३१ जुलै या दिवशी हिंदूंच्या धार्मिक यात्रेवर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केले. याविषयी राज्याचे गृहमंत्री अनिल विज म्हणाले की, अशा प्रकारच्या आक्रमणाची कोणतीही पूर्वसूचना आम्हाला नव्हती. घटनेच्या दिवशी दुपारी ३ वाजता आम्हाला तेथील एका व्यक्तीने माहिती दिली. त्यानंतर पोलीस तेथे पोचले.
नूंह हिंसा में बड़ा खुलासा: सरकार के पास हमले का इनपुट ही नहीं था, मंदिर में फंसे व्यक्ति ने दी थी खबर#NuhViolence #NuhConspiracy #AnilVij #Haryana #MewatAttack https://t.co/ihSeAwuTqk
— Amar Ujala (@AmarUjalaNews) August 5, 2023
गृहमंत्री विज म्हणाले की, राज्याच्या गुप्तचर विभागाला ही माहिती का मिळाली नाही, याची चौकशी केली जात आहे. दुसरीकडे राज्याचे गृहसचिव टी.वि.एस्.एन्. प्रसाद यांनी गृहमंत्री विज यांच्या विधानाच्या एक दिवस आधी म्हटले होते, ‘आम्हाला आक्रमणाविषयी आधीच माहिती मिळाली होती. तसेच ही माहिती नूंह येथे झालेल्या शांती समितीच्या बैठकीतही देण्यात आली होती. त्या वेळी आश्वासन देण्यात आले होते की, यात्रेमध्ये कोणताही अडथळा येणार नाही.’ (प्रशासन आणि सरकार यांच्यात समन्वय नाही, असे समजायचे का ? – संपादक)
संपादकीय भूमिकाआंतरिक शत्रूंच्या कारवायाविषयी माहिती मिळवू न शकणारी सरकारी यंत्रणा परकीय शक्तींची आक्रमणे कशी परतवून लावणार ? |