सनातनचे ३२ वे (व्यष्टी) संत पू. सौरभ जोशी हे बहुविकलांग असल्यामुळे त्यांना वाक्ये बोलता येत नाहीत. ते एक-एक शब्द उच्चारतात. त्यामुळे ‘त्यांना काय सांगायचे आहे ?’, ते समजून घेण्यासाठी त्यांना प्रश्न विचारावे लागतात. १६.६.२०२३ ते २२.६.२०२३ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेला ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ रामनाथ देवस्थान (बांदोडा (फोंडा), गोवा) येथे पार पडला. १६.६.२०२३ या दिवशी पू. सौरभदादा आणि मी (त्यांचे वडील श्री. संजय जोशी) यांच्यात याविषयी झालेली प्रश्नोत्तरे येथे दिली आहेत. यातून बहुविकलांग असूनही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या समष्टी रूपाची सूक्ष्मातून सेवा करणार्या पू. सौरभदादांची साधनेची तळमळ दिसून येते.
१. पू. सौरभदादांना लवकर झोप येणे; म्हणून त्यांना त्याचे कारण विचारणे
‘१६.६.२०२३ या दिवशी रात्री ८.३० वाजताच पू. सौरभदादांना झोप येत होती. प्रतिदिन ते एवढ्या लवकर झोपत नाहीत; म्हणून त्यांना याविषयी विचारतांना आमच्यात झालेला संवाद येथे दिला आहे.
मी (श्री. संजय जोशी) : पू. दादा (पू. सौरभ जोशी), आज दमलात का ?
पू. सौरभदादा : हो.
मी (श्री. संजय जोशी) : आज रामनाथ देवस्थान (फोंडा, गोवा) येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ चालू झाला आहे; म्हणून तुम्ही सूक्ष्मातून तिकडे गेला होता का ?
पू. सौरभदादा : हो.
२. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ सुरळीत पार पडावा’, यासाठी पू. सौरभदादांनी नामजपादी उपाय केल्यामुळे ते थकणे
मी (श्री. संजय जोशी) : तिकडे नामजपादी उपाय करत होता का ?
पू. सौरभदादा : हो.
मी (श्री. संजय जोशी) : म्हणून थकल्यासारखे वाटते का?
पू. सौरभदादा : हो.
मी (श्री. संजय जोशी) : समष्टीसाठी ‘श्रीं’च्या (टीप) चरणी प्रार्थना करत होता का ?
(टीप : पू. सौरभदादा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना ‘श्री’, असे संबोधतात.)
पू. सौरभदादा : हो.
मी (श्री. संजय जोशी) : ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी तिकडे अन्य उपाय चालू आहेत का ?
पू. सौरभदादा : हो.
मी (श्री. संजय जोशी) : ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त काही अडचण नाही ना ? (या प्रश्नावर पू. सौरभदादा शांत राहिले.)
मी (श्री. संजय जोशी) : ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ निर्विघ्नपणे पार पडू दे’, यासाठी मी प्रार्थना करतो.
पू. सौरभदादा : हो.
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या समष्टी रूपाची सूक्ष्मातून सेवा करणारे पू. सौरभदादा !
वरील प्रश्नोत्तरावरून माझ्या लक्षात आले, ‘पू. सौरभदादा देहाने इकडे (कुडाळ येथे) असले, तरी सूक्ष्म रूपाने ते श्री गुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’रूपी समष्टीत आहेत. गुरुमाऊलीला (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) समष्टी आवडते, त्याप्रमाणे पू. सौरभदादांनाही ‘श्रीं’चे समष्टीरूप आवडते.
४. कृतज्ञता
‘गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळेच पू. सौरभदादांशी संवाद साधता आला आणि त्यातून गुरुदेवांनी पू. सौरभदादांची समष्टी कार्याची तळमळ लक्षात आणून दिली’, यांसाठी गुरुमाऊली आणि पू. सौरभदादा यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता !’
– श्री. संजय जोशी (पू. सौरभ जोशी यांचे वडील), कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (१७.६.२०२३)
|