‘हिंदु धर्म’ हा विश्वातील सर्वोत्कृष्ट धर्म असून तो ‘जगद़्गुरु’ पदावर आरूढ आहे. आज या तेजस्वी धर्माला अज्ञान आणि अधर्म यांचे ग्रहण लागले आहे. खरे तर आम्ही दसरा, दिवाळी, जन्माष्टमी साजरी करतो; परंतु आमच्या मुलांना हे सगळे सण, उत्सव आपल्या विजयाचे प्रतीक आहेत, हे मात्र सांगत नाही.
या सण-उत्सवांमागील शास्त्र मुलांना सांगितले, तर त्यांनाही त्यातून प्रेरणा मिळेल. आज आपल्याकडील शाळांमधून मुलांना मोगल आणि इंंग्रज यांचा इतिहास ५०० पानांचा, तर हिंदूंचा सुवर्णकाळ मात्र केवळ २५ पानांचा शिकवला जातो. ही लाजिरवाणी आणि दुःखद गोष्ट आहे. आज मुलांना प्रेरणा देण्यासाठी देशभक्ती शिकवावी लागते; म्हणूनच हिंदूंचे सण आणि उत्सव हे आपले विजयोत्सव आहेत, हे मुलांना सांगून ते त्याच पवित्र भावनेने आपण साजरे करायला पाहिजेत. यासाठी प्रत्येक हिंदूने प्रतिदिन केवळ १ घंटा धर्मासाठी जरी दिला, तरी देश प्रगतीपथावर जाईल.
– श्री. विनोदकुमार सर्वोदय, उत्तरप्रदेश