ईश्वराच्या मार्गावर चालणार्यांना जे भोगांमध्ये पाडतात, संसारात आकर्षित करतात, ते लोक पुष्कळ पाप कमवतात. जे लोक भोग वासनेचे संकल्प करतात, भोगाच्या तृप्तीची इच्छा करतात आणि ईश्वराच्या मार्गावर चालणार्यांकडून संसाराचा स्वार्थ साधू पहातात, ते लोक स्वतःशीच धोका करतात.
कुणाचे कपडे किंवा धन, तसेच कुणाचे दुकान किंवा घर हिरावून घेणे इतके पाप नाही, जितके पाप भगवंताचा मार्ग हिरावून घेतल्याने होते. एखाद्या साधकाचा किंवा संतांचा वेळ घेतल्याने पुष्कळ पाप होते. संत तर क्षमाशील असतात, ते तर काहीच करणार नाहीत; पण जर ईश्वराच्या मार्गावर चालण्यासाठी संतांचा वेळ घेतला, तर ठीक आहे; परंतु जर तुम्ही त्या मार्गावर चालला नाही आणि संतांचा वेळ व्यर्थच नष्ट केला, तर त्याचा मोबदला चुकवावा लागतो.’
(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, अंक ३४१)