‘शास्त्रानुसार आचरणाचे धर्म-अनुष्ठानाचे फळ हे आहे की, संसारापासून वैराग्य येईल. सत्संगाचे, शास्त्र अध्यायनाचे आणि धर्माचे फळ हेच आहे. जर वैराग्य येत नसेल, तर तुम्ही जीवनात धर्माचरण केले नाही, शास्त्रांचा पूर्ण अर्थ समजून घेतला नाही. धर्माचे अनुष्ठान (धर्माचे आचरण) केल्याने विरक्ती येते आणि योगाचे अनुष्ठान केल्याने ज्ञान होते. ज्ञानाने मोक्षाची प्राप्ती होते, निर्वाण होतो, म्हणजेच ज्ञानाने जन्म-मरणाची परंपरा तुटते, संपते; तेव्हाच तर त्याने मनुष्य जन्माचे फळ मिळवले.
मृत्यू येऊन आपल्याला संसारातून घेऊन जाईल, त्यापूर्वीच आपल्या पद्धतीने भगवंताकडे वाटचाल करणे ठीक आहे. मृत्यू येऊन फरफटत आपल्याला घराबाहेर काढेल, त्यापूर्वीच घराची ममता सोडून द्यावी. हे शरीर शव होईल आणि कुटुंबीय तुमच्या वस्तू दुसर्यांना वाटतील, त्यापूर्वीच आपल्या हातांनी त्या का वाटू नयेत ? ईश्वराविना कोणत्याही वस्तू, व्यक्ती आणि परिस्थितीत मन लावणे, हे स्वतःशीच धोका करणे आहे.
(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, वर्ष २४, अंक १)